बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळी झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं टेन्शन वाढलंय. शिर्डी भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचं बोललं जात आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडवर 2.0 ने मात करत विजय मिळवलायं.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने साडीतले फोटो शेअर करीत ही शेवटची पोस्ट असं कॅप्शन दिलंय.
सरकारी योजनांच्या लाभासाठी महिलांनी चालाखी दाखवून सासू-सूनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असा अजब सल्ला शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिलायं.
अजित पवार वेशांतर प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीयं.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून तोडगा काढावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर 700 कोटी रुपये खर्च केले असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय.
'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजारपणाचा आधार घेत सर्वाोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलायं.