परभणीत जोरदार पाऊस कोसळल्याने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचं 17 एकरमधील सोयाबीन वाहुन गेलंय. या पावसामुळे डख यांना चांगलाच फटका बसलायं.
अहमदनगरमध्ये सकल हिंदू मोर्चात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालायं.
देशात शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून धडाकेबाज निर्णय घेण्यात आले असून जवळपास 14 हजार कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीयं.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकर वनराज आंदेकर यांचा दोन सख्ख्या बहिणींनीच गेम केला असून दोन बहीणींसह मेहुण्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलीयं.
विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना जोडो मारो आंदोलनावरुन नवीन नाव दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
आमचे अब्बा पाकिस्तानात नाहीतर हिंदुस्तानात बोलले आहेत, त्यामुळे कोणीही मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे, या शब्दांत आमदार नितेश राणेंनी खुलेआम धमकावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच बाहेर पडू या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदार उमेश पाटील यांनी ठणकावलंय.
दहा आमदार आले तरीही मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा होऊ शकतो, असं मोठं विधान करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलायं. ते अकोल्यात बोलत होते.
छत्रपती शिवरायांची एकदाच काय तर शंभरवेळा माफी मागणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीयं. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.