राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
मुंबईत दहीडाहांडी उत्सवाला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे, येतंय, उंचावर थर रचताना तब्बल 41 गोविंदा जखमी झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आलीयं.
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा मायावती यांच्यावर सोपवण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीकडून घेण्यात आलायं.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.
जम्मू काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्सला आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचं गणित सुटलंय. नॅशनल कॉन्फरन्सला 51 तर काँग्रेसला 32 जागा मिळाल्या आहेत, तर 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, ते दुर्देवी आहे. आमचे मंत्री परिस्थितीची पाहणी करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीयं.
साखर विक्रीचा करार करूनही व्यापाऱ्याला साखरेचा पुरवठा न केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.