निलेश लंके यांना संधी देण्यात माझाच पुढाकार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारताना सांगितलंय.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
माझ्यावर पोलिस शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा झालायं का? याबाबत पोलिसांनी हो, नाही काहीच बोलले नसल्याचं खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय शाहबाज शरीफ सरकारकडून घेण्यात आलायं
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन देऊ नये, असं कुठं लिहुन ठेवलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो, या शब्दांत दिलीप खेडकर यांनी IAS पूजा खेडकरवरील आरोपांवर उत्तर दिलयं.
अहमदनगर जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीयं. तर जामखेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपळगावचा पूल खचून गेला आहे.
आयएएस पूजा खेडकर यांना ऑडी कारला लाल दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपासासाठी कार जमा करण्याबाबतची नोटीस धाडलीयं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
आयएएस पूजा खेडकर यांच्या खाजगी ऑडी कारच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर आई मनोरमा खेडकर यांनी दमदाटी केल्याचं समोर आलंय. सगळ्यांना आतमध्ये टाकणार असल्याचं म्हणत खेडकर यांनी दमदाटी केलीयं.