Satyashil Sherkar : पुण्यात राष्ट्रवादीच्या मुलाखतीत पोहोचला काँग्रेसचा नेता; चर्चांना उधाण…

Satyashil Sherkar : पुण्यात राष्ट्रवादीच्या मुलाखतीत पोहोचला काँग्रेसचा नेता; चर्चांना उधाण…

Satyashil sherkar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ncp Sharad Pawar Group) मुलाखती सुरु आहेत. अशातच या मुलाखतस्थळी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छूक असलेले सत्यशील शेरकर (Satyashil sherkar) या ठिकाणी पोहोचल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच सत्यशील शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यात सांगली पॅटर्न राबवण्यात चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत होतं. आता काँग्रेसकडून इच्छूक असलेला नेता राष्ट्रवादीच्या मुलाखतस्थळी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जम्मूच्या लोकांना धन्यवाद अन् हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे..,; निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या मुलाखतीत सत्यशीर शेरकर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरु असलेल्या चर्चांना खुद्द सत्यशील शेरकर यांनीच पूर्णविराम दिलायं. माध्यमांशी संवाद साधताना शेरकर म्हणाले, माझा इथे यायचा आणि मुलाखतींचा हा योगायोग आहे. मी जुन्नर मतदारसंघातून इच्छूक आहे. मी मुलाखत दिलेली नाही पण महाविकास आघाडीकडून लढण्यास मी इच्छूक आहे. महाविकास आघाडीतील नेते शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं शेरकर यांनी सांगितलंय.

आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळला; भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित…

तसेच जुन्नर मतदारसंघात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संकाटाला सामोरं जाव लागत असल्याने खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन उपाययोजना करण्यासाठी मी इथे आलो होतो. त्याचवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली असून त्यांनाही घटनेबद्दल सांगितलं असल्याचं शेरकर यांनी सांगितलंय.

हरियाणातील व्हिक्ट्रीने महाराष्ट्र, झारखंड अन् दिल्लीत भाजपला मिळणार बूस्ट..

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच पुण्यात आज राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. या मुलाखतींना पुण्यातील अनेक इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. याचवेळी काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांनी हजेरी लावल्याने एकच चर्चा रंगली. या चर्चेनंतर खुद्द शेरकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं तरीही शेरकर विधानसभा निवडणुकीत नेमकं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील याची उत्सुकता अनेकांना लागलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube