वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी-भाजपातील वाद विकोपाला गेला असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रार केलीयं.
प्रदीप मुखर्जी लिखित परमात्मांचा संदेश पुस्तकाचे अहमदनगरमध्ये प्रकाशन करण्यात येणार असून एक संवाद प्रदीप सरांशी या कार्यक्रमातून प्रदीप मुखर्जी संवाद साधणार आहेत.
पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी 13 जणांना अटक केलीयं.
अहमदनगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलीयं.
ईडीच्या भीतीनेच विरोधकांच्या दारात लाचारासारखे जाऊन बसले असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलीयं.
समरजित घाटगे यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदाराच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवारांनी दिलायं.
बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिलांसाठी चांगले काम सुरु असून त्या राजकारणातही नेतृत्व करु शकतात, या शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सूचक विधान केलंय.
एसटी महामंडळ कृती समितीची मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच बैठक पार पडली असून ही बैठक निष्फळ ठरलीयं. उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे.
दिल्ली-आगरा महामार्गावर गोरक्षकांकडून एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हत्या झाल्याची घटना घडलीयं. गो-तस्कारांच्या संशयावरुन ही हत्या झालीयं.
पीडित महिलांच्या न्यायासाठी पश्चिम बंगालमध्ये अपराजिता महिला विधेयक मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामध्ये बलात्काऱ्याला 10 दिवसांत फाशीची तरतूद करण्यात आलीयं.