महाराष्ट्रातील महिलांसह आता उत्तर भारतीय महिलांनाही मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकावणाऱ्या स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय.
हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीयं.
संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणाचा लाभ एकाच कुटुंबाला वारंवार मिळणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
निवडणुकीशी थेट संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांना सध्या सुरु असलेल्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली जाणार नसल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलायं. यासंदर्भातील अधिसूचना आयोगाकडून जारी करण्यात आलीयं.
भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक ते बोलत होते.
केरळमधील वायनाड भूस्खलनात मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली असून आत्तापर्यंत 205 निष्पाप जीवांचा बळी गेलायं. पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे.
शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचाच पॅटर्न राबवण्यात येणार असून अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मदत करतील, या पलीकडे त्यांची कुवत हैसियत नाही, असा सणसणीत टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलायं.