अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी ते उद्योजकांना भेटत आहेत. त्यांनी मुंबईत रोड शो केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीकडून योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत आहे. […]
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांचा मुंबई रोड-शो झाला आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी योगी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. […]
मुंबईःप्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी-महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही घटक पक्षांना आपले मित्र पक्ष घेण्याचा आधिकार आहे. जागा वाटप करताना त्या घटक पक्षाने आपल्या वाट्याच्या जागा मित्रपक्षाला सोडाव्यात, अस थेट विधान करत अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य केलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. […]
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज संप मागे घेतला. राज्यभरात आंदोलन
पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युतीवर मुंबईत घोषणा झाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घेत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु आहे. त्यापूर्वीच ह्या दोन्ही गटाची युती झाली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित […]
मुंबईः उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकमेंकाना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जात आहे. २०२४ला दिपक केसरकरांनीच जेलमध्ये जायची तयारी ठेवावी, सगळे तयार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले […]
मुंबईः येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व आमच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा होत आहे. शिवसेनेला वंचितबरोबर आघाडी करायची आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांना शिवसेनेला एकत्र घ्यायचे आहे. पण राष्ट्रवादीचा आम्हाला खुला विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. गरीब मराठा सत्तेमध्ये येऊ नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. […]
पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. […]
औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अर्ध्याहून आमदार हे भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच केला होता. त्यानंतर आता भाजपकडून वेगळीच राजकीय खेळी केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दाव्यावरून उघडकीस आले आहे. मराठवाड्यातील लोकसभेचे आठही उमेदवार भाजप चिन्हावर विजयी होतील, असा दावा सावे यांनी केलाय. भाजपने राज्यातील महत्त्वाच्या जागांवर […]
नवी दिल्लीः सरकारच्या नोटबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सोमवारी हा निकाल दिला आहे. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटबंदीच्या प्रक्रियेत काहीच गोंधळ झालेला नाही. हा निर्णय बदलू शकत नाही, असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे. चार न्यायाधीशांनी नोटबंदीच्या बाजूने निर्णय दिलाय. तर एका न्यायाधीशांनी नोटबंदी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल […]