अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
अहमदनगरः तुमचं लाडकं लेट्सअप आता नव्या स्वरूपात येत आहे. आमचा नवीन पत्ता Letsupp.com असा असणार आहे. या पत्त्यावर आता तुम्हाला राजकारणाची बित्तंबातमी, रंजन आणि माहितीपर मुलाखती, मनोरंजनाचा खजिना, स्पोर्ट्सचा धमाका, लाइफस्टाइलचा सल्ला असे सारे येथे मिळणार आहे. लेट्सअपची ही नवीन वेबसाइट संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीसाठी आली आहे. या वेबसाइटचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि अन्य […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघे एकाच पक्षात असताना पक्षस्तरावर हा वाद डोकेदुखी ठरत होता. दोघे कायमच एकमेंकावर कुरघोड्या करत होते. त्यात काही वर्षांत सत्यजित तांबेंवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होता. तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हेच आधार म्हणून होते. विखे व थोरात […]
अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह दिसून आला. अचानक काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपनेही अधिकृत उमेदवार दिला नाही. तर सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला आहे. एकीकडे स्वतः पक्षाला धक्का देणारे तांबे यांनी दुसऱ्या पक्षाकडे पाठिंबा मागणे हे […]
(अशोक परुडे यांजकडून) अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमधील मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. सुधीर तांबे हे अर्ज भरण्यासाठी नाशिकला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सत्यजीत होता. अचानक सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे […]
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष आता आणखी वाढणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या आदेशावरून ‘आप’ला एक नोटीस काढण्यात आली आहे. त्यात ‘आप’ने आपल्या जाहिरातीसाठी सरकारी पैशांचा वापर केला आहे. सरकारी पैसा व त्यावरील व्याज असे तब्बल १६४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत भरावेत, अशी नोटिसीमध्ये म्हटले आहे. […]
अधिकृत उमेदवारी देऊनही अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबेंवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणारः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे मी अद्याप भाजपच्या नेत्यांशी बोललो नाही, आता भाजप नेत्यांना भेटणारः सत्यजीत तांबे सत्यजीत तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार, एबी फॉर्म मात्र नाही सत्यजीत तांबे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, दोन अर्ज दाखल भाजपचा एबी फाॅर्म घेऊन […]
नाशिकः विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. नाशिकमधील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आज प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तनुजा या नाशिक पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. […]
अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवरून तीन वेळेस निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात भाजप तगडा उमेदवार देण्याची चर्चा होती. पण अद्याप भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नाही. या ठिकाणी भाजपकडून वेगळा चमत्कार केला जाईल, असेही बोलले जात होते. परंतु अद्याप तरी भाजपकडून उमेदवारही जाहीर […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने […]
मुंबईः राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तारखांसाठी नेते आणि कार्यकर्ते यांची प्रतीक्षा सुरू असतानाच त्या आधीच राज्य सरकारने त्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महापालिकेतील एकूण सदस्य संख्येच्या कमाल दहा टक्के किंवा दहा सदस्य (या पैकी जे कमी असेल ते) यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा […]