अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबईः खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका केली. तर शिंदे गटातील काही जणांमध्ये असलेल्या वादावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात स्वतःला विलीन करून घेतील व हेच त्यांचे ध्येय असल्याचा दावाही त्यांनी केलाय. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर राऊत म्हणाले, आत्मपरीक्षण […]
अहमदनगरः अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत शिंदे-भाजप सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने नगर महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मागवण्यात आल्याने अहमदनगर महापालिकेतील अधिकारी गोंधळून गेले […]
पुणेः भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची 100 एकर जमीन सरकारने संपादित करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे आठवले म्हणाले. ऐतिहासिक विजय स्तंभ […]
औरंगाबादः हिवाळी अधिवेशनात गायरान जमिनीच्या प्रकरणातून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना विरोधकांनी घेरले होते. अधिवेशन संपल्यानंतर सत्तारांनी माझ्याविरोधात शिंदे गटातील जवळचे नेते अडचणीत आणत असल्याचे गौप्यस्फोट केला होता. तर सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात एक अडचण आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला येणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक हे कार्यक्रमस्थळाहून निघून जात होते. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हे […]
पुणेः पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाण्याचे टाळले आहे. चंद्रकांत पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. तसेच एक पत्र त्यांनी ट्वीट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय?, छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. परंतु तिथे काही जण गोंधळ घालून दंगल करतील. अनुयायांचा […]
कोल्हापूरः माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरएसएसच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्यावर विधिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. माझ्यासाठी लिंबू टिंबूची भाषा करायला लागले आहेत. मी वर्षा बंगल्यावर गेल्यावर पाटीभर लिंब सापडली. त्यात सगळं होतं. लिंबू, टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचा आरोपही शिंदे यांनी […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला 2014 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते. प्रत्येकाचा दिवस येत असतात. आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या […]
मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मनसेच्या […]
नागपूरः हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळ परिसरात वेगळेच चित्र दिसून आले. मंत्री गुलाबराव पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकमेंकाशी गुप्तगू करताना दिसले. बराच वेळ ते एकमेंकाशी बोलत […]