अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
पुणेः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर महिलेने शोषणाचे आरोप केले आहेत. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पीडित महिलेची ओळख उघड केली. त्यामुळे ठोंबरे अडचणीत आल्या आहेत. पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी ठोंबरे यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत राज्याच्या महिला आयोगाच्या […]
मुंबईः व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणूकप्रकरणी ही कारवाई झाली आहे. सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने […]
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की […]
पुणेः लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा […]
कोणताही निर्णय मी स्वत;च घेतो. राजकारणात येण्याचा माझा स्वत;चा निर्णय असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं.
गंगटोकः सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झालेत. उत्तर सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. […]
मिरपूरः मिरपूर कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेश संघ 227 धावांत गारद झालाय. भारताचे गोलंदाज उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्यात. सलामीवीर शुभमन गिल 14 आणि केएल राहुल तीन धावांवर खेळत आहेत. त्यापूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. परंतु […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले. दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. […]
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. […]
नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पटोले म्हणाले की, […]