अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
World Economic Forum 2023 in Davos :मुंबईः सुपा एमआयडीसीत जपान इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येत आहे. या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील […]
अहमदनगरः विधानपरिषदेचा नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) राजकारणातील मोठ्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या पक्षाविरोधातील भूमिकेमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. मात्र यामुळे बाळासाहेब थोरातच अडचणीत सापडले आहेत. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारण्यांमधील नातेसंबंधही पुन्हा चर्चेत आले आहेत. यामध्ये सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या […]
मुंबईः सत्यजित तांबेंच्या (satyjeet tambe) बंडखोरीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh)यांनी तांबेंच्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांना बदलावे, असे पत्रच देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले आहे. पटोले यांच्यावर काही आरोप देशमुख यांनी केले आहेत. […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबईः मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना ईडी चौकशीबाबत समन्स मिळाल्याचं समोर आलं आहे. चहल जात्यात का आले? की परमवीर सिंग यांच्यासारखे बॉम्बला फोडण्यासाठी लागणारी ‘ वात ‘ ची भूमिका बजावतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या वर्षात अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे राळ उठवली गेली. एक वर्ष या प्रकरणात अनिल […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबईः बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. राज्यातील अनेक साखर कारखाने आणि सूतगिरणीवर शेकडो कोटी रुपयांचे कर्ज असताना बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. खरंतर २६ कोटी रुपयांची ही थकबाकी आहे. ती भरण्याची तयारी बोंद्रे यांनी दाखवली आहे. खरंतर या […]
अहमदनगरः तुमचं लाडकं लेट्सअप आता नव्या स्वरूपात येत आहे. आमचा नवीन पत्ता Letsupp.com असा असणार आहे. या पत्त्यावर आता तुम्हाला राजकारणाची बित्तंबातमी, रंजन आणि माहितीपर मुलाखती, मनोरंजनाचा खजिना, स्पोर्ट्सचा धमाका, लाइफस्टाइलचा सल्ला असे सारे येथे मिळणार आहे. लेट्सअपची ही नवीन वेबसाइट संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीसाठी आली आहे. या वेबसाइटचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि अन्य […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघे एकाच पक्षात असताना पक्षस्तरावर हा वाद डोकेदुखी ठरत होता. दोघे कायमच एकमेंकावर कुरघोड्या करत होते. त्यात काही वर्षांत सत्यजित तांबेंवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होता. तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हेच आधार म्हणून होते. विखे व थोरात […]
अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह दिसून आला. अचानक काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपनेही अधिकृत उमेदवार दिला नाही. तर सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला आहे. एकीकडे स्वतः पक्षाला धक्का देणारे तांबे यांनी दुसऱ्या पक्षाकडे पाठिंबा मागणे हे […]
(अशोक परुडे यांजकडून) अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमधील मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. सुधीर तांबे हे अर्ज भरण्यासाठी नाशिकला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सत्यजीत होता. अचानक सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे […]
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष आता आणखी वाढणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या आदेशावरून ‘आप’ला एक नोटीस काढण्यात आली आहे. त्यात ‘आप’ने आपल्या जाहिरातीसाठी सरकारी पैशांचा वापर केला आहे. सरकारी पैसा व त्यावरील व्याज असे तब्बल १६४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत भरावेत, अशी नोटिसीमध्ये म्हटले आहे. […]