- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Karnataka assembly election 2023: आप सर्व जागा लढणार, केजरीवालांकडून घोषणा
Karnataka assembly election 2023: नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आज जाहीर झाला आहे. कर्नाटकमधील सर्व जागा आम आदमी पार्टी (पक्ष) लढणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे कर्नाटकामध्ये अनेक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यामध्ये काँग्रेस, आप या पक्षाकडून कंबर कसण्यात आली आहे. Arvind Kejriwal […]
-
गिरीश बापट अधिकाऱ्यांना नडले ! अनेकांना सरळ केले
अहमदनगरः गिरीश बापट यांना २०१४ च्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी हे खाते तेवढेच महत्त्वाचे होते. स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा मोठा अपहार होण्याचे प्रकार उघडकीस येतात. बापट यांच्या काळात धान्य दुकानातील गैरव्यवहार कोट्यवधीचे प्रकरणी उघडकीस आले होते. त्यात नाशिकमधील प्रकरण कोट्यवधी रुपयांचे होते. त्यात अनेक […]
-
मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव, मंत्री शंभूराज देसाई पाॅझिटिव्ह
मुंबईः राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.त्यात आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंत्री देसाई यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. देसाई हे अनेक आमदार व मंत्र्यांच्या संपर्कात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्यांनी कोविड […]
-
बावनकुळे हे वर्षभर घरीच जाणार नाहीत; हर्षवर्धन पाटलांनी सांगितले नियोजन
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनाकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा झाली. सभेचे आयोजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होत. हर्षवर्धन पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. बावनकुळे हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे कसे दौरे करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे याबाबत अनेक दाखले दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता त्यांना थेट […]
-
ओबीसीवरून छगन भुजबळांनी भाजपला फटकारे; मोदी हे आडनाव
नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत. खासदारकी गेली आता […]
-
क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे पुण्यातून बेपत्ता झालेले आहेत. महादेव जाधव यांचे (वय ७५, रा. प्लॅट नं. ००२, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. क्रिकेटर केदार जाधव यांचे वडील […]
-
जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा
अहमदनगरः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या धक्क्याची दखल अजित पवार यांनी घेतली आहे. कालच्या कर्जत येथील सभेत याबाबत अजित पवार बोलले आहेत. नुसते बोललेच नाही. तर कोणी शेण खाल्लं आहे, त्याला असा झटका देईल की त्याच्या दहा पिढ्याला लक्षात राहिल, असा सज्जड इशारा दिला आहे. अजित पवार हे कसा करेक्ट कार्यक्रम करतात हे राष्ट्रवादी, […]
-
Rahul Gandhi यांची खासदारकी जाताच बच्चू कडूच झाले व्हायरल ! त्यांचे पद का नाही गेले?
मुंबईः पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. पण त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची […]
-
फुलराणी Review : शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा चित्रपट
एखादी व्यक्ती जिद्द, मेहनत आणि प्रेमाच्या जोरावर ध्यानीमनी नसलेलं ध्येय साध्य करते. अशी हटके कहाणी तुम्हाला फुलराणी या चित्रपटात पाहायला मिळते. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रियदर्शनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने याआधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून […]
-
राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू नका; जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या अधिवेशनात आक्रमक होऊन बोलत आहेत. ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार जुंपली आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विजेसंदर्भातील टोरंटो कंपनीसंबंधित मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. टोरंटो प्रकरणी उगाच राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू […]









