Pradhan Mantri Awas Yojna : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरे बनविण्याचे निश्चित केले आहे. मात्र, जवळपास दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेळेवर मंजुरी न दिल्याने उत्तर प्रदेशची चांदी झाली आहे. केंद्र सरकारने अन्य राज्य सरकारांच्या या गाफीलपणामुळे त्यांच्याकडील 1.44 लाख घरांचे आवंटन काढून घेऊन ते उत्तर प्रदेशला दिल्याची […]
Balasaheb Thorat on Ahmednagar Violence : नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे दोन हत्याकांड एकापाठोपाठ घडले. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाइपलाइन रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर भाजपशी संबंधित काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. या […]
Devendra Fadnavis : राज्यात अंमली पदार्थांचा धोका वाढला हे खरच आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. नवीन पुरवठा साखळी तयार झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. राज्यातील दहशतवाद विरोधी पथकालाच आता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Narendra Modi on Opposition Patries Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीत काहीही करून केंद्रातील सत्ताधारी भाजपाचा पाडाव करायचा या उद्देशाने देशातील विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरूत जमा झाले आहेत. येथे प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक (Opposition Parties Meeting) होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींनी या संमेलनाला […]
Chandrashekhar Bawankule : देशभरातील विरोधकांची दुसरी बैठक आज बंगळुरूत होत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. बावनकुळे यांनी एक […]
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मंत्री तुपाशी, जनता उपाशी.. शेतकऱ्यांचे केले हाल मंत्री झाले मालामाल.. अशा घोषणा ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या. या आंदोलनात […]
Kirit Somaiya : चौकशांचा ससेमिरा मागे लावून विरोधी पक्षांतील नेत्यांना घाम फोडणारे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे सोमय्या बॅकफूटवर गेले आहेत. यानंतर सोमय्या यांनी पुढे येत प्रतिक्रिया […]
Maharashtra Rain : राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. आता मात्र पावसाबाबत गुडन्यूज मिळाली आहे. राज्यात पुढील 12 दिवस पावसाचे असणार आहेत. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते […]
Nawab malik Withdraws Bail Application : मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशाीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकणात मलिक यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, आता मलिक यांच्याकडून हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. Maharashtra Politics : ‘पवार साहेबांनी […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्य सरकारमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी रविवारी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही हे आमदार शरद पवारांच्या भेटीला आले होते. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. आमदारांनी घेतलेल्या या भेटीत काय चर्चा झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत […]