दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात (Budget Session) सध्या उद्योगपती गौतम अदानींवरून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. या मुद्द्यावर सातत्याने गदारोळ सुरू असून कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. सोमवारी (दि.१३) सुद्धा राज्यसभेत जोरदार गोंधळ उडाला. सोमवारची सुरुवात गदारोळात झाली. अदानी (Gautam Adani) प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. दरम्यान, […]
मुंबई – समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राज्यसभेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 9 फेब्रुवारीचा आहे. या व्हिडिओत जया बच्चन या सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर […]
मुंबई – राज्याच्या राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) पायउतार झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून कोश्यारींसह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यात आता मोदींनी संसदेच्या आधिवेशनात केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देत शिवसेनेने सामनातून मोदींवर जहरी टीका केली आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त […]
पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर रविवारी दिवसभरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी पेढे वाटून कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. “एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना (Governor) महाराष्ट्र […]
मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही या मुद्द्यावर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या, की ‘राज्यपाल कोश्यारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मने दुखावली की राज्यातच […]
मुंबई – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा (BJP) सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, […]
नागपूर – भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) म्हणाले की, समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवता येणार नाही. सात दशकांनंतर त्याला गुन्हेगार ठरवण्यात आले. आपल्या समाजात हा एक अन्याय होता. नागपूरच्या (Nagpur) वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पसमध्ये आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) पहिल्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी माजी CJI शरद बोबडे, MNLU चे संस्थापक कुलपती […]
पुणे – पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शनिवारी पुण्यात आले होते. येथे त्यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील […]
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त […]
नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्यात वाद असल्याचा चर्चा नेहमीच होत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीपासूनच हा वाद सुरू होता. मध्यंतरीच्या काळात हा वाद आधिकच वाढला होता. फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावेळीही पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या वादाला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आज मात्र हा […]