Irshalwadi : अजितदादा, फडणवीसांच्या पावलावर ठाकरेंचे पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Irshalwadi : अजितदादा, फडणवीसांच्या पावलावर ठाकरेंचे पाऊल; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत दरड कोसळण्याच्या (Irshalwadi Landslide) घटनेला आज दोन दिवस उलटून गेले आहेत. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. राजकीय नेतेही येथे मदतकार्यात सहभागी होत आहेत. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले वाढदिवस साजरे करणार नाहीत असा निर्णय घेतला त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा तुर्तास रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आज स्वतः इर्शाळवाडी गावात जाणार आहेत. येथील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याच्या घटनेला आता 48 तास उलटून गेले आहेत. या भीषण दुर्घटनेत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अजूनही शंभर पेक्षा जास्त या लोक या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले असून त्यांचा पत्ता लागलेला नाही. चिखलाने भरलेली पायवाट तुडवत बचावाचे कार्य सुरुच आहे.

या दुर्घटनेनंतर गुरुवारी दिवसभर शोधकार्य राबविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, टीडीआरएफ, स्थानिक सामाजिक संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि अन्य संस्थांचे मिळून एकूण 900 जण या बचाव कार्यात सहभागी झाले होते. या गावात रस्ता नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा हातात टिकाव, फावडे घेऊन हातानेच गाळ उपसत दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पाऊस तर थांबण्याचे नाव घेत नव्हता. खराब हवामानाचा बचावकार्यात वारंवार अडथळा येत होता.

Irshalwadi landslide : मृतांची संख्या वाढली! आणखी 6 जणांचे मृतदेह मिळाले, अद्यापही बचावकार्य सुरूच

 

भाजपाचा सेवा दिन, अजितदादांचे संकटग्रस्तांना मदतीचे आवाहन

दरम्यान, इर्शाळवाडीतील दुर्घटनेची तीव्रता पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आजच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले. वाढदिवस साजरा करू नका, होर्डींग्ज लावू नका. यावर केला जाणारा खर्च इर्शाळवाडी संकटग्रस्त लोकांच्या मदतीसाठी उपयोगात आणा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करणार नाही असा निर्णय घेतला. त्यांच्या वाढदिवशी भारतीय जनता पार्टी सेवा दिन म्हणून साजरा करणार आहे.  संकटग्रस्त लोकांच्या मदतीचे काम भाजप कार्यकर्ते करणार आहे. राज्यात 50 हजार रुग्णमित्र तयार केले जाणार आहेत. ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती .

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube