Irshalwadi landslide : मृतांची संख्या वाढली! आणखी 6 जणांचे मृतदेह मिळाले, अद्यापही बचावकार्य सुरूच

Irshalwadi landslide : मृतांची संख्या वाढली! आणखी 6 जणांचे मृतदेह मिळाले, अद्यापही बचावकार्य सुरूच

Irshalwadi landslide updates : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला. बुधवारी रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळल्यानं 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. काल मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं. कालच्या बचावकार्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा होता. त्यामुळं आजही एनडीआरएफने बचावकार्य केलं. दरम्यान, आता मृतांच्या संख्येत वाढ झाली असू्न आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Irshalwadi landslide Death toll rises in accidents total death 22)

रायगड जिल्ह्यातील खालपूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी दरड कोसळली. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कडेला वसलेले हे गाव रात्री गाढ झोपे असतांनाच या गावातील अनेकांवर काळाने घाला घातला. यात अनेक घरं डोंगराखाली गाडली गेली. या घटनेची माहिती मिळताच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि इतर एजन्सी दुर्घटनास्थळी दाखल झाल्या. गुरुवारी सकाळपासून एनडीआरएफ जवानांनी बचावकार्य केलं. काल रात्री अंधार आणि पावसामुळं हे काम थांबवण्यात आलं. तोपर्यंत 16 जणांचे मृतदेह आणि काही जखमी जखमींना बाहेर काढण्यात आलं होतं.

शुक्रवारी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ या यंत्रणांनी आज पुन्हा मातीचा ढिारा उपसायाच्या कामाला सुरूवात केली. डोंगर कोसळल्याने घरांवर सुमारे 15 ते 20 फूट माती साचली होती. आज पहाटे ढिगारा उपसायाला सुरूवात झाल्यानंतर आत्तापर्यंत आणखी 6 मृतदेह हाती लागले आहेत. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

आष्टी तालुका नगर जिल्ह्याला जोडा; बीडच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी 

स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. त्यातील सुमारे 17 ते 18 घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात 98 व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले आहे. 228 पैकी उर्वरित 109 व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही, असेही मुख्यमंत्री
@mieknathshinde यांनी स्पष्ट केले.

इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. त्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील दरडग्रस्त भागातील नागरिकांना कायमस्वरूपी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube