लखनौ येथे एक बहुमजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य वीस जण जखमी झाले आहेत.
राज्यभरात आज गणरायाचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदारी अनेक कलाकारांनी आपल्या घऱी गणरायाची स्थापना केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या निर्णयाचा आता साक्षात्कार होत आहे. शरद पवार यांना सोडण ही आपली चूक असल्याचं ते बोलत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.
2022 च्या शिक्षक भरतीतील सात हजारांहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
एकून ४ टक्के गोड पाण्याचा स्रोत असल्याने पाण्याचा योग्य वापर करावा अस पीएम नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते गुजरादमध्ये बोलत होते.
इंदूर-जबलपूर एक्स्प्रेसचे दोन डबे जबलपूर स्थानकाजवळ येत असताना रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही प्रवाशी जखमी झाले नाहीत.
आजपासून राज्यभरात गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात पुण्यात दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
प्रकृती जास्त खालावल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू.
आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.