- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Jalna Maratha Protest : मराठा आंदोलनात झालेली दगडफेक भिडेंच्या सांगण्यावरून? समन्वयकांचा आरोप
Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं परिस्थिती चिघळली आहे. या लाठीचार्जमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहेत. दरम्यान, आता मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक संजय लाखे पाटील […]
-
IND vs NEP : भारताला नेपाळचं 231 धावांचं लक्ष्य; जडेजा, शमीने घेतले प्रत्येकी 3 बळी
IND vs NEP : आशियाई विश्वचषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना रंगला. टॉस जिंकून नेपाळ संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या इनिंगमध्ये नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर रचला आहे. यामध्ये नेपाळचा धुव्वाधार फलंदाज सोमपाल याने एकूण 48 धावांची खेळी केली तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने 3-3 बळी घेतले आहेत. तर मोहम्मद शमी, […]
-
Pankaja Munde : पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू, आगामी निवडणुकांत समीकरणे बदलणार?
-
Sajan Pachpute : ठाकरे गटात येताच साजन पाचपुतेंना मोठं पद, काका-पुतण्याचा संघर्ष पेटणार!
Sajan Pachpute : पवार कुटुंबातील काका-पुतण्याच्या राजकारणाने राज्याच्या राजकारण ढवळून निघालेलं असतांना आता आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातही संघर्षसुरू झाला. बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पातपुते (Sajan Patpute) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उबाठात (शिवसेना)गटात प्रवेश केला. यावेळी साजन यांची उपनेतेपदीही निवड करण्यात आली. https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80 साजन पाचतपुते यांनी काही दिवसांपूर्वी […]
-
Puneshwar temple : ‘अन्यथा आम्हीच मज्जीद पाडू’; पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा पेटला, लांडगेंनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम
Puneshwar temple : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आज पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. भाजपसह अन्य काही हिंदू संघटनांच्यावतीने पुणे महापालिका (Pune Municipality) आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर आदोलंन करण्यात आलं. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. आयुक्तांनी काहीही कारवाई केली नाही तर आम्ही मज्जीद पाडून […]
-
Jalna Maratha Protest : मावळ, गोवारी गोळीबाराचे आदेश कुणी दिले? फडणवीसांचा विरोधकांना सवाल
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं राज्यातील परिस्थिती चिघळलेली आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली. दरम्यान, आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी […]
-
Jalna Maratha Protest : ‘मी क्षमा मागतो’, फडणवीसांनी लाठीचार्ज प्रकरणी मागितली माफी
Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने मी क्षमा मागत असल्याचं मोठं विधान केलं. नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषेदत फडणवीस बोलत होते. https://www.youtube.com/watch?v=TWoD7CRKg80 पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, जालन्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही लाठीचार्ज झाला, […]
-
RRC Apprentice Recruitment 2023 : दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, भारतीय रेल्वेत 2409 पदांची भरती सुरू
Railway Recruitment Cell Apprentice Recruitment : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती (Railway recruitment)प्रक्रिया राबवते. भारतीय रेल्वेत नोकरी मिळावी याासठी लाखो तरुण प्रयत्न करत असतात किंवा संधीची वाट पाहत असतात. […]
-
Asia Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, आशिया कपमधून जसप्रीत बुमराह अचानक मायदेशी परतला
Asia Cup 2023 : आशिया कप खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कोलंबोहून मुंबईत आला आहे. यॉर्कर किंग तडकाफडकी माघारी गेल्यानं संघासाठी मोठा धक्का आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. बुमराहच्या अचानक कोलंबोहून मुंबईत परतण्याचे कारण काय हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात […]
-
उद्या तलाठी परीक्षा होणारच, वेळेपूर्वी सेंटरवर हजर राहा; परीक्षा आयोजक संस्थेचा उमेदवारांना मेल
Jalna Maratha Protest : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत. या घटनेच्या निषेधार्थ अनेक जिल्ह्यात आंदोलनं, निदर्शन आणि बंद पुकारण्यात आला. यामुळं उद्या राज्यभरात होणाऱ्या तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थ्याच्यावतीने कॉंग्रेसने ही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, आता तलाठी […]









