- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती सुरू, पगार 1,40,000 रुपये
Indian Railway job: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया राबवते. आताही रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (Mumbai Railway Development Corporation Limited) काही पदांसाठी नवीन भरती […]
-
Talathi Bharati Exam : ज्याने पेपर फोडला, तो मुख्य आरोपीच झाला पास, गणेश गुसिंगेला 138 गुण
मुंबई : तलाठी भरती परीक्षेचा (Talathi Recruitment Exam) पेपर फोडणारा आरोपीच या परिक्षेत पास झाला असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपीला तलाठी परीक्षेत 138 गुण मिळाले आहेत. गणेश गुसिंगे असं आरोपीचे नाव आहे. गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) यांचे नाव तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी चर्चेत आलं होतं. मात्र, आता त्याला या परीक्षेत138 गुण मिळाले असल्यानं […]
-
बच्चू कडू मोठे नेते, त्यावर मी काय बोलावं; तटकरेंचा उपहासात्मक टोला
Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर बोलतांना प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या खेळींचा जास्त विचार केला तर डोकं फुटून जाईल. काका-पुतणे महाराष्ट्राला […]
-
‘नाना पटोले माझे मित्र, त्यांना मी माफ करतो’; जपानहून परतताच फडणवीस असं का म्हणाले?
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या जपान दौऱ्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार टीका केली होती. राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. शेतकरी, महिला, युवक यांचे कित्येक प्रश्न प्रलंबित आहे. आणि सरकारमधील मंत्री देश फिरताहेत, असं वक्तव्य पटोलेंनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आता फडणवीसांनी समाचार घेतला आहे. मी पटोलेंना गांभीर्याने घेत […]
-
धक्कादायक! नगरच्या पोलीस अधिक्षकांचेच फेसबुक अकाऊंट हॅक
अहमदनगर : आजकाल सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहून सायबर भामटेही यावर सक्रीय झालेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडून पैस मागण्याचे सर्रास घडतांना दिसतात. जनतेचे संरक्षक असलेले पोलिसही या हॅकिंगपासून (Hacking) वाचू शकले नाही. आता नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कदायक प्रकार […]
-
संतापजनक! चोरीच्या संशयातून तरुणांना उलटं टांगून जबर मारहाण, नगर जिल्ह्यातील घटना
अहमदनगर : एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना दुसरीकडे मात्र, सातत्याने दलितांवर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शेळी चोरीच्या संशयावरून घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी […]
-
Chandrayan 3 : विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर, ISRO कडून व्हिडिओ ट्वीट
Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, आता चांद्रयान-3 चा प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि […]
-
नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले, शहरात एक दिवस उशीराने येणार पाणी
अहमदनगर : महावितरण कंपनीकडून महत्वाच्या कामांसाठी उद्या शनिवारी (दि. 26) रोजी मुळा धरण येथील विद्युत वाहिनीवर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या काळातच अमृत योजनेवरील दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. दरम्यान या कामामुळे नगरकरांच्या पाणी पुरवठ्याचे (Water supply) वेळापत्रक कोलमडणार आहे. या कामामुळे नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह […]
-
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी आराखड्यास मान्यता, केंद्राचा मोठा निर्णय
मुंबई : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली. महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 सागरी जिल्ह्यांकरता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी. झेड. एम. पी) मान्यता मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली. ही परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव […]
-
फडणवीस उद्या मायदेशी परतणार; जपान दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं?
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जपान दौऱ्याच्या आज अखेरच्या आणि पाचव्या दिवशी त्यांनी सोनी (Sony), डेलॉइट आणि सुमितोमो (Deloitte and Sumitomo) कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्या आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छुक असल्याचं सांगितलं. त्यांनी सोनी समूहाला फिल्मसिटीमध्ये येण्याचं तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती केली. तर बांधकाम क्षेत्रात […]









