- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
भाजपने शड्डू ठोकला! विरोधकांना आस्मान दाखवण्यासाठी नेमणार एक लाख वॉरियर्सची टीम
Chandrasekhar Bawankule : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. २०२४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली. भापजकडूनही विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी अनेक अभियान राबवण्यात येते आहे. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यात भाजप एक लाख सोशल […]
-
India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?
India China Conflict : चीन (China) काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहालया मिळत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननं आता मोठं पाऊल उचललं आहे. चीन सरकारने सोमवारी (28 ऑगस्ट) अधिकृतपणे एक नवीन नकाशा (China New Map) जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश […]
-
Mumbai : मंत्रालयात खळबळ! धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून पाठोपाठ मारल्या उड्या
मुंबई : शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अमरावती जिह्याची (Amravati district ) ही ओळख पुसल्या जात नाहीत. आताही अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी (Dam affected farmers) मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना समोर आली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाली. आज मंत्रालयात या समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या […]
-
कावड यात्रेत खुलेआमपणे तलवार फिरवणं आमदार बांगरांना महागात पडलं, गुन्हा दाखल
MLA Santosh Bangar : सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. नाग समजून दूध पाजलं, मात्र आता उलटून डसायला लागला, असं वक्तव्य […]
-
कोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी संपवल जीवन; लातूरच्या अविष्कार कासलेचे टोकाचे पाऊल
Avishkar Kasale Suicide : राजस्थानच्या कोटा (kota) येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अभ्यासाच्या दडपणाखाली घेतलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमधील परीक्षेवर बंदी घातली आहे. कोचिंग परीक्षेवर घातलेली ही बंदी तुर्तास […]
-
उद्धव ठाकरेंना नात्यांचे महत्त्व कळत नाही; ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं प्रत्युत्तर
Bhavana Gawali on Uddhav Thackeray : काल उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींना भावना गवळींनी मागची वर्षी राखी बांधली होती. त्यावरूनच ठाकरेंनी भावना गवळींवर लक्ष्य केलं. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत त्यांनी भावना […]
-
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनमध्ये बारावी पास ते पदवीधारकांसाठी बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
National Seeds Corporation Recruitment 2023 : नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनने (National Seeds Corporation) काही पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 89 जागा भरल्या जातील. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणं 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून […]
-
Aditya L1 : इस्त्रोचे आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाईल? आपल्याला काय फायदा होणार?
Aditya L1 : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. असं सांगितले जात आहे की ISRO 2 सप्टेंबर रोजी सन मिशन (Sun mission) लॉन्च करणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय अवकाश मोहीम असेल. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, […]
-
अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा, लोकांना सभेसाठी जबरदस्तीनं आणलं; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Vijay Vadettiwar on Ajit Pawar : काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीडमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं. तर बीडमधील सभेतून शरद पवारांवर टीका केल्यानं कार्यकर्त्यांनी राडा केल्याचं पाहायला मिळाला. दरम्यान, यावरूनच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]
-
अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा
कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]









