H3N2 : बदलत्या ऋतूमध्ये भारतातील सर्व भागांमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. हा विषाणू फ्लू किंवा कोविड-19 नाही. पण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण इन्फ्लूएंझा H3N2 ग्रस्त आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद […]
कांद्याचे दर कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे सरकाराला जाग यावी यासाठी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे कांदा पाठवला आहे. तर गळ्यात कांद्याचे हार घालून शेतकऱ्यांनी ही गांधीगिरी पद्धतीने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राजेंद्र चव्हाण यांनी […]
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून वाद पेटला असताना आता धाराशिवमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने 8 मार्चपासून धाराशिव येथे साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला […]
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. मागील आठवड्यात विधानसभेत त्यांनी हा आरोप केला होता. विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप […]
“मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे.” अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. देहू (Dehu) येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित […]
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्या सभेपेक्षा दुप्पट लोकांची गर्दी होईल, असा खोचक टोला केसरकर यांनी लगावला. शालेय […]
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये (kasba bypoll) भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या निकालानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. अखेरीस य प्रकरणी यवतमाळमधून एकाव्यक्तीला ताब्यात घेतलं. हा व्यक्ती ठाकरे गटाचा हा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आलं आहे. हेही वाचा : ठाकरेंना सीएमपद सांभाळता आले नाही, ते पीएम पद काय सांभाळतील?; […]
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरत होत होती.अदानीच्या शेअर्सची किंमत जवळपास 85 टक्क्यांनी घसरली होती आणि अदानी समूहाचे मार्केट कॅप 145 अब्ज डॉलरहून अधिक घसरले होते. पण मागील आठवड्यात अमेरिकन कंपनी जीक्यूजी पार्टनर्स अदानींसाठी तारणहार म्हणून समोर आली. राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्स कंपनीने अदानी समूहाचे 15,446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. ही […]
छत्तीसगडचे (chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) यांनी सोमवारी विधानसभेत पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार (unemployment) भत्ता देण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प […]
“घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने, निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.” अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी आज कांदा पिकाची होळी केली, त्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. कांद्याला भाव […]