भारतात ब्रिटिश राजवटीपूर्वी (British Raj) हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. त्यावेळी देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. रविवारी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की “ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील […]
Ambadas Danve On Imtiaz Jaleel : “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करा” अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असं नामांतर झालं आहे. या नामांतराला विरोध […]
मागील एका महिन्यापासून आर्थिक जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे ते म्हणजे अदानी ग्रुप (Adani Group) आणि बाजारात होत असलेली त्याची घसरण. पण गेल्या चार दिवसापासून हे चित्र बदललेलं दिसलं. याच कारण म्हणजे अदानी ग्रुपमधील एक गुंतवणूक. जानेवारी महिन्यात अदानी ग्रुपवर पब्लिश झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) अहवालानंतर अदानी ग्रुपला मोठा फटका बसला. गेल्या महिनाभरापासून अदानी […]
काल तुम्ही जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तमाशा केला, त्याच व्याजासकट उत्तर येत्या १९ तारखेला मिळेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, त्याला उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांचा जो अपघात झाला त्याची अजून चौकशी […]
“लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या महत्वकांक्षेची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच […]
ChatGPT या तंत्रज्ञानाने गेल्या काही महिन्यात मोठी चर्चा घडवून आणली आहे. जगभरातील लाखो लोक हे वापरत असले तरी त्याची उत्तरे देण्याची शैली पाहून लोक प्रभावित होत आहेत. पण फक्त प्रभावित होण्याचा विषय नाही कारण चॅटजीपीटीने जगभरातील अनेक मोठ्या परीक्षा पास केल्या आहेत. ओपन एआय नावाच्या कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केले आणि तेव्हापासून याची मोठी […]
गुरुवारी महाराष्ट्रात पोटनिवडणुकीचा निकालाची चर्चा असताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एक पॅनेल तयार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाने देशातील निवडणुकांमध्ये कितपत बदल होईल?
“रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन पण देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत.” अशी टीका कसबा पोटनिवडणुकीत पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यांनतर रवींद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. “भविष्यात देवेंद्र फडणवीस भाजपला रसातळाला नेतील, असं म्हणत सत्ता गेल्यावर फडणवीसांना […]
Supreme Court On Election Commission : गुरुवारी महाराष्ट्रात पोटनिवडणुकीचा निकालाची चर्चा असताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एक पॅनेल तयार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या पॅनेलमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. हेच […]
“माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो.” अशी आठवण शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये बोलताना सांगितली. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. […]