नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]
केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्ली सरकारमधील लोकांना अटक होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल हे आज सकाळपासून ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचं हे ध्यान काही मिनिट नाही तर तब्बल सात तास चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही दिवसापूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली […]
संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची मागणी केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा हक्कभंग प्रसाव मांडला. राऊतांवरील हक्कभंगाबाबत 2 दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा नार्वेकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत यांच्यावरील कारवाईबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली […]
आज 8 मार्च जगभरात महिला दिन (International women’s day) म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जगभरात महिला दिनाच्या दिवशी महिला हक्क, महिला सबलीकरण, महिलांचा विकास, महिलांची प्रगती अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही एक आवाहन केले आहे. आपल्या सोशल मीडियावरून राज ठाकरे यांनी […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेकडून “नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज !”ची या कॅप्शनखाली एक टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसे अधिकृत या मनसेच्या अधिकृत अकौंटवरून या व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज ! […]
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरु होत आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नक्की काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान कांदा भावाचा प्रश्न आणि १२वीचे पेपरफुटी या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका केली होती. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर […]
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करणार आहेत. “यंदाचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल,” अस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच एका कार्यक्रमात जाहीर केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? यंदाचा अर्थसंकल्प […]
धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही, अशी टीका माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत […]
“ज्या दलितांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल त्यांना आरक्षणाचा (Reservation) लाभ देऊ नये” असं वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी केलं आहे. या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, संविधान बनवताना हिंदू धर्मातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांसाठी आरक्षणाची सुविधा निश्चित करण्यात […]