केपटाऊन : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी मात देत ऑस्ट्रेलियन महिलांनी विश्वचषक मिळवला आहे. विशेष म्हणजे सहाव्यांदा विश्चषकावर ऑस्ट्रेलियन महिलांनी नाव कोरलं आहे. टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 156 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट आखला जात होता. त्या कटाचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थ संकल्प अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत […]
पुणे – आत्ताचा भारतीय समाज अनेक अंगाणी ढवळून निघाला आहे. संधिग्ध आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची समाजाला मोठी गरज आहे. महाराष्ट्राला आणि देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा शरद पवार (Sharad Pawar) यांना अनुभव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे (A. H. Salunkhe) यांनी केले. ते […]
मुंबई : सामान्य शिवसैनिकाला गद्दार गँग घाबरत आहे. हुकूमशाही पद्धतीने भाजप-शिंदे गट आपल्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, हा महाराष्ट्र दिल्लीसमोर कदापी झुकणार नाही. आज देखील आपल्या वरळीतील निर्धार मेळाव्याची धास्ती मिंधे गटाला पडली. म्हणूनच त्यांनी महापालिकेच्या लोकांना पाठवून आपल्या कार्यक्रमांची पोस्टर, स्टेज हटवण्याचा प्रयत्न केला. पण […]
मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अर्थ संकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला व्हिप बजावला आहे. हा आमदार शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांना लागू असून त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनाही तो पाळावा लागेल. अन्यथा दोन आठवड्यानंतर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ, असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला. राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सोमवार (दि. २७) […]
केपटाऊन : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS v SA) यांच्यात केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 156 धावांवर रोखले. (T20 World Cup Women Final) ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी […]
मुंबई : गेले आठ महिने राज्यात अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, प्रशासकीय अराजकता आहे. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाऐवजी, बाहेरंच जास्त फिरतात. प्रशासन ठप्प आहे. राजकीय अस्थितरतेचा विकासप्रक्रियेवर परिणाम होत आहे. मंत्री, सत्तारुढ पक्षाचे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये, वर्तनाने राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. उद्योग, व्यापार राज्याबाहेर चालले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी अन्य राज्ये महाराष्ट्रात येऊन […]
मुंबई : अजित पवार म्हणाले की आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. पण मला वाटतं की त्यांचे एक मंत्री जेलमध्ये गेले आहेत. दाऊदची बहिण हसीना पारकरला त्यांनी चेक दिला होता. त्यांचा राजीनामा देखील घेऊ शकले नाहीत. त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. बरं झालं आमची अजित पवार यांच्याबरोबर चहाची वेळ टळली. देशद्रोह मोठा […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आल्यानंतरंच, आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे […]
मुंबई : राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही, मातीमोल दरानं कृषी उत्पादन विकण्याची वेळ, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरु आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, राज्यातली […]