सोलापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, यामध्ये अजित पवारांचा नाहक बळी गेला असे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले आगामी 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात राहणार […]
नागपूर : जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर (BJP) नाहीत. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठला ही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात […]
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण […]
कूचबिहार : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कूचबिहारमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ते आणि तृणमूल (Trinamool Congress) कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये केंद्रीय गृह, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक (Nisith Pramanik) यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. दिनहाटा परिसरात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मंत्री निशीथ प्रामाणिक जात असताना ही घटना […]
कसबा ( Kasaba ) आणि पिंपरी चिंचवड या दोन पोटनिवडणुकीचा प्रचार आता थांबला आहे. पण आज महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी भाजपवर (BJP ) पैसे वाटत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी उपोषण देखील केले. यानंतर भाजपने हा पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. […]
नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे.इतर समाजाचे देखील प्रलंबीत प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, अशापद्धतीने विकास बाजूला ठेवून जे […]
कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाच्या अनेक बूथ वरती बोगस मतदान करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून झालेले आहे. याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नाव दिसून आलेली आहेत . आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. याबाबत पोलिसांनी दक्ष राहिले पाहिजे, बंदोबस्त बुथ मध्ये शाळांमध्ये लावला गेला पाहिजे यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांना भेटलो, अशी […]
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्ष कुणाची मते खातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी व […]