पिंपरी : सन २०१९ च्या तुलनेत म चिंचवडच्या या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, घसरलेला हा टक्का नेमकं कुणाचं गणित बिघडवणार आहे. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे देखील या निवडणुकीत प्रभावी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याचा भाजपच्या अश्विनी जगताप (AShwini Jagtap) यांनी फायदा किंवा […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला. एकीकडे सकाळ सत्रात मतदारांचा उत्साहच दिसला नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या याद्यामध्ये अनेक मयतांची नावे आढळून आली. त्यामुळे बोगस मतदान होण्याचा धोका व्यक्त होत आहे. मतदार याद्या आद्ययावत केल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मयतांची नावे मतदार याद्यात आढळून […]
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचे, मारण्याच्या धमकी दिली जात आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान झाले तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त मतदानासाठी शेवटचे दोन तास राहिले आहे. त्यामुळे मतदानची टक्केवारी आणखी वाढणार याकडे लक्ष लागले असून वाढणाऱ्या टक्केवारीचा फायदा भाजपला (BJP) होणार की महाविकास आघाडीला (MVA) होणार याची देखील उत्सुकता लागली […]
मुंबई : मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन व्हावे या मागमीसाठी चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज ३२ वा दिवस आहे. कर्नाटक राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या […]
केपटाऊन : ICC महिला T20 विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ प्रथमच T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा अंतिम फेरीचे पोहचला आहे. या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेची नजर […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad by-election) भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये (NCP) यांच्यात मोठी चुरस सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) एका कृतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात ‘शिट्टी’ वाजवत एकप्रकारे राहुल कलाटेंचा (Rahul Kalate) प्रचार केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राहुल कलाटे ‘शिट्टी’ याच चिन्हावर […]
रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावेळी ते म्हणाले, आपण राजीनामा दिला असं कोणी सांगितलं?, बाळासाहेब यांनी घेतलेल्या या यु-टर्नमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची बातमी चांगलीच […]
अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Aurangabad and Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेवर टीका केली होती. पण आता दोन महिन्यांतच विखेंनी यू र्टन घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचा […]