विष्णू सानप पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या २६ तारखेला मतदान होणार असून दोन तारखेला निकाल लागणार आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. […]
आजपासून सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. कोर्टामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाकडून नव्याने सुनावणी केली जाणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या […]
आसाम : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Guwahati Crime) दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. (Assam Murder) आसामच्या गुवाहाटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Assam Crime) आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. […]
सांगली – सहकारतीर्थ कै. गुलाबराव पाटील यांच्यामुळे मंत्रीपद मिळाल्याचा किस्सा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी सांगलीतील कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर सांगितला. त्यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे एकाच मंत्रिमंडळात काम करीत होते. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या अंतुले सरकारमध्ये दोघांनाही संधी मिळाली नव्हती. सुशिलकुमार शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील जाऊन बराच काळ झाला […]
मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ इतर पक्षांवरही येण्याची शक्यता असून पक्षही संपवतील की काय, अशी भीती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि […]
पिंपरी : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) पुण्य-कोल्हापूरमध्ये आले आणि थापा मारून गेले. त्यांनी फक्त एक सर्जिकल स्ट्राईक केलं तर धिंडोरा पिटला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र, इंदिरा गांधी असा प्रचार केला नाही. यांना फक्त निवडणूक जिंकायची असते. भाजप क्रूर पक्ष आहे, अशी घणाघाती टीका भाजप आणि […]
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आज महिला T20 विश्वचषकामध्ये (Women’s T20 World Cup) आयर्लंडविरुद्ध 87 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान मानधनाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. डावखुऱ्या मानधनाने 56 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा […]
पिंपरी : स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या धनुष्यबाणाची पूजा केली ते धनुष्यबाण तुम्ही चोरून नेण्याचं पाप केलं. २०१४ आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना कोण ओळखत होते. तेव्हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच मतं मागितली ना, पंतप्रधान मोदी यांचा फोटो नसताना शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. मग आता माझा […]
पिंपरी : भाजप-शिंदे सरकार आल्यावर येथील कंपन्या गुजरातला पळवल्या. आता देव पण पळवत आहे. भीमाशंकरही आसामला पळवल जात आहे. आमचं परळीच जोतिर्लिंग झारखंडला गेलं. हिंगोलीच औंढा नागनाथ गुजरातला नेलं. विठ्ठल जरी बाहेर पळवून नेला तरी हे म्हणतील आपण तिरुपती आणू, असा भजपला (BJP) खोचक टोला लगावत सुरतेचा इतिहास माहिती होता. मात्र आता सत्तेसाठी लोटांगण घातलं […]
नांदेड : माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. माझ्यावर पाळत ठेवली जातेय, अशोक चव्हाण कुठं चाललेत? कोणाला भेटतात? आणि चर्चा तर अशी करतात की याचा मेटे (Vinayak Mete) करा, याला मेटे सारखं करुन टाका, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते […]