मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर गटाला आव्हान देत खुलासा करण्याची मागणी करत असतांना शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ दिला. बंडखोर गटाने एकदा स्पष्ट करावे, की ते शिवसेना सोडून का गेले, त्यांना महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले का ? हिंदुत्वासाठी सोडून गेले का ? खोके मिळाले म्हणून सोडून […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आर्थिक जगतात ओळख असलेल्यांचा हा आशेचा किरण घेऊन येत आहे. आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. त्यांचे संबोधन हे भारताच्या […]
मुंबई : अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. एवढीच अपेक्षा आहे की, दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प (budget) मांडला जाऊ नये. या देशामध्ये शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आज देखील न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलं, तर त्याचं स्वागत केले जाईल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं […]
पुणे : पुणे शहरात आजची सकाळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमावर जोरदार टीका करणाऱ्या फलकाच्या चर्चेने रंगली. शहरातील मुख्य भागात युवासेना सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी आणि अप्रत्यक्षरीत्या काही क्लासवर जोरदार टीका करणारे असंख्य फलक लावले आहेत. हे फलक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत […]
पुणे : २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा मालक असलेला मतदार यांच्या भीतीपोटी नोकर झालाय, आणि नोकर मालक झालाय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पुढील आगामी काळात ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलो आहोत. […]
नवी दिल्ली : आजपासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) एक दिवस आधी सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? (What is Economic Survey?) आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला वार्षिक अहवाल […]
नवी दिल्ली : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत जयराम रमेश यांनी […]
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Co-Oprative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात १० ठिकाणी शोध मोहीम राबवली, अशी माहिती सक्त वसुली संचालनालयानेच (Enforcement Directorate) स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. बेहिशोबी शेकडो कोटीचे कर्जवाटप केल्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली असावी, असा अंदाज […]
मुंबई : राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक (Vidhan Parishad Election) अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, […]
पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नवी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू करण्यास परीक्षार्थींचा विरोध आहे. ही पद्धती २०२५ नंतर लागू करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, अशी माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. तसेच लिपिक व टंकलेखक भरती परीक्षेची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर न करता […]