पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एका व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविषयी बोलत आहेत. त्यात राज […]
सोशल मिडीया हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे सर्वच सोशल मीडिया कंपन्या सतत काहीतरी नवीन अपडेट देत असतात. मागच्या काही दिवसात ट्विटरकडून ( Twitter) अनेक नवीन अपडेट युझर्ससाठी दिले आहेत. त्यात आता आणखी एका फीचर्सची भर पडणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ऍप मध्ये अनेक नवीन बदल केले […]
मुंबई : येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयाच्या भागातही जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात […]
मुंबई : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सर्दी, खोकला, ताप या वायरल इन्फेक्शनबरोबर इतर आजारही बळावतात. त्यातीलच एक म्हणजे सांधेदुखी. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी […]
भुवनेश्वर :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेतील क्रॉसओव्हर सामना अत्यंत चुरशी झाला. या चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत शूटआऊटमध्ये विजय मिळवला आहे. भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या […]
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ परिणय बंध सभागृहात आयोजित पदवीधर मतदार मेळाव्यात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते, त्यावेळेस ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर कायमच अन्याय केला. परंतु विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात विदर्भाला न्याय मिळवून देण्याचे काम […]
पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यक्रमात शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलत असताना एकमेकांना दिलेली टाळी इंदापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलीय. आत्ता अजितदादांनी पाटलांना टाळी दिली असली तरी आगामी निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या पारड्यात वजन टाकणार की […]
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक खेचून आणली परंतु विरोधकांकडून याबाबत दिशाभूल केली जात असून ती दुर्देवी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्ह वरून स्पष्ट केले. सामंत म्हणाले की, भारतात एखाद्या परकीय कंपनीस गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीची भारतात नोंदणी अनिवार्य आहे. न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि. […]