मेलबर्न : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबत बरेच विक्रम त्याने नावावर केले आहेत. 200 धावा केल्यानंतर त्याला हाताच्या दुखण्यामुळे मैदान सोडावे लागले होते, त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि […]
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उद्या दि. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून ‘साहेब मी गद्दार नाही’ अशी एक जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये प्रकाशित केली आहे. यानिमित्ताने संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. या निमित्ताने संजय राऊतांनी एक निर्धारही व्यक्त केलाय. काय आहे या जाहिरातीमध्ये? बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना या जाहिरातीमध्ये म्हटलं […]
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार, अशी भूमिका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी सोबत धर्मवीर छत्रपती संभाजी […]
पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे येथे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला (Students) शिक्षकाविषयी शेरो-शायरी केली म्हणून शिक्षक (teacher) आणि शिपायाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीसांत (Police) शिक्षक जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे या दोघांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समूहातील एका विद्यार्थ्याने […]
पुणे: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale MNS) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगर येथील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुंडांनी गोळ्या झाडल्या. थिगळे यांचे कुटुंबीय ही घटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास […]
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले […]
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांना जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) तज्ज्ञ सदस्य असे पद देण्यात आले आहे. यावरुन बोलताना ठाकरे गटातील नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवतारेंना टोला लगावला. पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवतारेंवर तोंडसुख घेतले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
औरंगाबाद : अहमदनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या मॉकड्रीलमध्ये नारे तकदीर अल्लाहू अकबर ची नारेबाजी होणे हे खूप दुर्दैवी आहे. यावरून असे दिसून येते की, आतंकी म्हणजे मुसलमान अशी मानसिकता पोलिसांची देखील झाली आहे. मी स्वतः देखील मुसलमान आहे. मी साध्वी प्रज्ञा सिंग नाही मी अजमल कसाब नाही, आतंकी म्हणजे मुसलमान अशा प्रकारची जी मानसिकता बनवली आहे. यावरून […]