रायपूर : रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवत मालिकेतही 2 -0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघालामाघारी परतवलं तत्पूर्वी टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धक्के […]
पुणे : गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील […]
अहमदनगर – न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचा (New Arts Commerce and Science College) विद्यार्थ्यी विशाल भाऊसाहेब पगारे याची यावर्षी नवी दिल्ली (New Delhi) येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक संचलनासाठी (Republic Day) निवड झाली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून वरिष्ठ विभागातून विशाल पगारे या एकमेव विद्यार्थ्यीची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ व ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. […]
नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे. मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]
जालन्यातील व्यावसायिक किरण खरात (Kiran Kharat) यांचे पुण्यातून अपहरण संपत्ती हडप केल्याचा आरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे क्रिकेटर विजय झोल (Vijay Zhol) यांच्यावर केला आहे. यातून आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जून खोतकरांमध्ये वादाची ठिणगी पडलीय.
मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार […]
अहमदनगर: शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सडकून टीका केलीय. ते परिवारासोबत शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देखील आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातील लोकांना संपविण्याचं काम केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे […]
पुणे: दावोसमध्ये (Davos) उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यातल्या विविध भागात उद्योग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.चा (Vasantdada Sugar Institute) पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर […]
जालना : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. काल बीडमधील (Beed) भाजपच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बावनकुळेंनी हे वक्तव्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजाताईंना आणि पक्षाला बदनाम करणारी एक युनिट […]
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात, लोक बहुतेक व्हायरल इन्फेक्शनने आजारी असतात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. हिवाळा म्हणजे आजारांचा ऋतू. हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे […]