अहमदनगर: शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सडकून टीका केलीय. ते परिवारासोबत शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देखील आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातील लोकांना संपविण्याचं काम केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे […]
पुणे: दावोसमध्ये (Davos) उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यातल्या विविध भागात उद्योग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.चा (Vasantdada Sugar Institute) पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर […]
जालना : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. काल बीडमधील (Beed) भाजपच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बावनकुळेंनी हे वक्तव्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजाताईंना आणि पक्षाला बदनाम करणारी एक युनिट […]
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात, लोक बहुतेक व्हायरल इन्फेक्शनने आजारी असतात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. हिवाळा म्हणजे आजारांचा ऋतू. हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे […]
मुंबई : झी स्टुडिओच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ ह्या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने बाजी मारलीय. झी स्टुडिओचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात ‘धर्मवीर’ सिनेमाने बाजी मारलीय. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू […]
नगर : न्यायालयाचे कामकाज ई फायलिंगद्वारे चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध आहे. वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध केला. तसेच तसा ठराव […]
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
नवी दिल्ली: सर्फराज खानकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर सडकून टीका केली आहे. सरफराज खान गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात सरफराज खानने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावातही शतक झळकावले होते. सर्फराज खानची संघात निवड न झाल्याने अनेक विद्यमान आणि माजी खेळाडू नाराज […]
नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने तिसरे शतक झळकावले, तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 13 वे शतक झळकावले. दिल्लीविरुद्ध १२५ धावांची इनिंग खेळल्यानंतर तो म्हणाला की, अनेकदा असे घडते की संघ कठीण परिस्थितीत जातो आणि नंतर क्रीजवर गेल्यावर विचार असा असतो, की मी जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवू शकतो. मी खेळपट्टीनुसार […]