मुंबई : सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिलाय. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. पण आजच्या घडीला व्यासपीठावरचं चित्र बघितलं तर दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद दिसतोय, अशी टोलेबाजी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केली. भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाधवांना खासदारकी लढवण्याची ऑफर […]
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. एमसीए सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांचा क्लब गटाकडून विजय झाला. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर यांची निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रविवारी एमसीए कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला. रोहित पवारांच्या निवडीनंतर सर्वच क्षेत्रातून […]
मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सुनिल तटकरेंना नक्कीच खंत वाटली असेल. आपण खासदाराऐवजी आमदार असतो तर मंत्री झालो असतो, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुनिल तटकरेंना लागवला. आपल्या सर्वांची बारकाईने माहिती ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना देखील जी माहिती नसेत ती ड्रायव्हरला असते. सुनिल तटकरेंचे वडिल ज्यावेळी दौऱ्यावर असायचे त्यावेळी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरियाणातील पानिपतमध्ये आयोजित शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 14 जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे पानिपतला जाण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी रोजी हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचं जागर केला जाईल. त्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतं. […]
पुणे : “बंडखोरीनंतर शिवसेनेने तीन वेगवेगळे प्रकल्प सुरु केले होते. त्यात एक फक्त शेतकऱ्यांशी संवाद आणि भेटीगाठी हा प्रोजेक्ट अंबादास दानवे चालवत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसंवाद यात्रा हा प्रोजेक्ट चालवत आहेत. याच्या माध्यमातून ते राज्यभरातील युवकांना भेटत आहेत आणि राज्यभरातील चळवळीतील लोक जोडण्यासाठी मी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे […]
पुणे : “पूर्वी बोलताना मी फार विचार करत नव्हते, आता विचार करावा लागतो. पार्टी प्रोटोकॉल, पार्टी लाईन याची काळजी करावी लागते” असे मत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी शिवसेनेत […]
पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो […]
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झालीय. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय. आजोबांपाठोपाठ आता रोहित पवारांचीही क्रिकेटच्या मैदानात दमदार एंट्री झालीय. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय […]
‘बॉईज 1’ आणि ‘बॉईज 2’ च्या प्रचंड धमाल.. मस्तीनंतर ‘बॉईज 3’ चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता सुमंत शिंदे, अभिनेता प्रतिक लाड, अभिनेत्री विदुला चौगुले आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांची लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत.
‘वेदांता’ समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून महाराष्ट्रात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातून गुजरातला नक्की काय काय गेलं हे जाणूण घेऊया…