दिल्ली : व्हाट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापर होत असलेले मेसेजिंग अप आहे. आपल्या युजर्ससाठी व्हाट्सअॅप दरवर्षी काही नवीन फीचर्स आणत असते. मागच्या वर्षी कम्युनिटी फीचर्ससह काही फीचर्स व्हाट्सअॅपने आणले होते. यावर्षीही व्हाट्सअॅपकडून काही नवीन फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. हे असतील व्हाट्सअॅपचे नवीन फीचर्स डेस्कटॉप कॉल टॅब काही वर्षांपासून व्हाट्सअॅपची कॉल सर्विस मोठ्या प्रमाणात वापरली […]
मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती […]
मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले. रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. त्या बाष्कळ विधाने करत आहेत. आता ती बंद केली पाहिजे. उर्फी जावेद प्रकरणात चाकणकर यांनी योग्य कारवाई केली […]
अहमदनगर : जिल्ह्यातील आदिवासी भागातील राहीबाई पोपरे या देशी बियाणे संग्रहाक म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. मात्र या राहीबाईंचे भाषण राष्ट्रीय पातळीवरील एका विज्ञान विषयक कार्यक्रमात बंद करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागले आहेत. नागपूरमधील १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महिला […]
पंढरपूर : खोटे दागिने विकून किंवा खोटे दागिने विकत घेऊन फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली असतील पण लोकांनी आता थेट पंढरपूरच्या विठ्ठलाची खोटे दागिने देऊन फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विठ्ठलाला थेट पोतंभर खोटे दागिने दान केल्याचं समोर आलं आहे. गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठठलाला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. […]
पुणे : ‘मिशन 45’ काही मोठी गोष्ट नाही. दोन वेळा आम्ही 43 सीट राज्यात आणून दाखवल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचं मिशन पूर्ण करू शकतो, असा विश्वास भाजप नेते आणि राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज (ता.5 जानेवारी) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला फडणवीस म्हणाले, आम्हाला असं वाटतं की आम्ही ‘मिशन 45’ पूर्ण […]
औरंगाबाद : मागच्या सरकारमध्ये निर्णयच होत नव्हते पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्योगासाठी आम्ही चांगले निर्णय घ्यायला सुरु केलं आहे. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले आहे. ते आज औरंगाबाद मध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. पायाभूत सुविधा निर्माण करणे, कर्ज उपलब्ध करून देणे, परवानगी आणि परवाने याची प्रक्रिया […]