मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आज चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. […]
मुंबई : दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं टार्गेट दिलंय. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 150 […]
मुंबई : कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. सुमित्रा सेन यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं. सुमित्रा सेन यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची […]
राजकोट : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यातील पहिल्याच षटकात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटनं हॅटट्रिक घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेता आली नाही. अशी कामगिरी करणारा जयदेव उनाडकट पहिलाच गोलंदाज ठरलाय. दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यात रणजी ट्रॉफीतील गट सामना खेळला जातोय. या सामन्यात दिल्लीच्या […]
मुंबई : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या संपात महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांचा सहभाग आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता […]
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या कारणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फैलावर घेत त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची धमकी दिली होती. अशी माहिती मंगळवारी खासदार विनायक राऊत […]
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं. मागील काही महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेहून इंजेक्शन मागविले होते. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. काही दिवसापूर्वी आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. मागच्या वर्षी लक्षणीय पद्धतीने गाजलेल्या विधान परिषद आणि […]
शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा: ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]