नवी दिल्ली : 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. कन्याकुमारीपासून प्रवास करीत काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी […]
नागपूर : कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या वर्षीच सप्टेंबरमध्ये चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यानंतर हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर […]
ब्राझील : फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांना ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला आणि फुटबॉलमध्ये पेले यांना देव म्हटले जाते. सध्या हाच फुटबॉलचा जादूगार पेले कर्करोगाशी लढा देत आहे. त्यांची प्रकृती नाजूक झाल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावर साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल […]
काठमांडू: नेपाळमधील राजकीय घटनांच्या नाट्यमय वळणात सीपीएन-यूएमएल आणि इतर लहान पक्षांनी सीपीएन-माओवादी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना पाठिंबा दिला आहे. ते नेपाळचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. ते नेपाळचे पुढील पंतप्रधान असतील आणि सोमवारी (26 डिसेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता ते तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर कोणत्याही राजकीय पक्षाला […]
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडलेत. कोर्टाच्या निर्णयात ढवळाढवळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर हायकोर्टाने कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर खंडपीठाचा आदेश समोर आलंय. त्यामुळे हे प्रकरण विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे. हायकोर्टात दाखल याचिकेनुसार, वाशिम जिल्ह्यातील गायरान […]
पुणे : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी बंड का केलं? या बंडाची बीजं कोणी पेरली यासंदर्भात अनेक तर्कविर्तक लावले जात होते. परंतु विजय शिवतारे यांच्या दाव्यानंतर या चर्चांना वेगळं वळणं मिळालं आहे. बंडाची बीजं मीच एकनाथ शिंदेंच्या मनात पेरली असा दावा माजी आमदार आणि […]
अहमदनगर : राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची आक्षेपार्ह बदली रद्द न झाल्यास तालुकाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. राहुरीत विरोधी पक्षांतर्फे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ नगर-मनमाड महामार्गावर आज विविध सामाजिक संघटना आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते […]
जगविख्यात फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन-ल्यूक गोडार्ड यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन कायदेशीर इच्छा मृत्यूचा आधार घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इच्छा मृत्यूच्या पर्यायांवर राष्ट्रीय चर्चा करण्याची घोषणा करावी लागली. भारतात इच्छा मृत्यूचा कायदा काय सांगतो? आणि असाध्य आजार झालेल्या रुग्णांनी इच्छा मृत्यूचा पर्याय निवडणे योग्य आहे का? हे जाणून घेऊया…
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे नुकतच निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्या बाबतीत अनेक किस्से उत्तर प्रदेशाच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा पट जेव्हा उघडला जातो त्यावेळी ‘मुलायम सिंह यादव, मयावती आणि गेस्ट हाउस प्रकरण’ याची चर्चा होते. हे प्रकरण समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा..
बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा सुरु झाली आहे. 261 किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या 67 किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हावासीयांच्या स्वप्नपूर्तीकडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.