मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली. नवाब मलिकांना अटक वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना […]
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मंत्री दावे-प्रतिदावे करत आहेत. काल महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या आक्रमकपणा विरोधात विधानसभेत ठराव समंत केला. ठरावानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच मागणीविरोधात कर्नाटक सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींचे आरोप झाल्यानंतर सीबीआय आणि ईडीने 130 पेक्षा जास्त धाडी आणि 250 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली. यानंतर परमवीर सिंह यांच्या पत्रातील शंभर कोटींचे आरोपाचे चौकशीत 4.70 कोटींचे […]
पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एखाद्या राजकीय […]
नागपूर : आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार यांना वाचविण्यासाठी महसूल मंत्र्यानी नागपूरमध्ये असत्य कथन करत खोटी माहिती देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. बाळासाहेब थोरातांच्या अनुपस्थित काँग्रेस पक्षाने निवेदन जारी केले आहे. बाळासाहेब थोरात यांना दुखापत झाल्यामुळे ते मुंबईतील रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे ते सभागृहात उपस्थित नाहीत. ते […]
नागपूर : देवेंद्रजी आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल, असा टोमणा अजित पवार यांनी फडणवीसांना लागवला. ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री […]