नागपूर : अतुल सावेजी तुम्ही सहकार मंत्री आहात. पण सहा महिने झाले अजून तुम्ही त्या खात्यात रुळला नाहीत. काही काम आणलं की देवेंद्रजींना विचारलं पाहिजे म्हणतात. पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता? त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कर्तृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? अशी टीका विरोधी […]
नागपूर : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एक शंका येते. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते पण यांच्या काळात कधी कोणत्या योजनेला स्थगिती दिली नव्हती. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणायला भाग पाडत आहात असं वाटतंय. यामध्ये त्यांची बदनामी कशी होईल असं तुम्ही वागताय. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस […]
नागपूर : आमचं सरकार स्थापन केल्यापासून सरकार घालवण्यासाठी ह्याचं पहिल्या दिवसांपासून काम सुरु झालं होतं. आणि ते करण्यासाठी वेशभूषा बदलून यायचे. आमचं सरकार पडेपर्यत स्वत:च्या तोंडाला कुलुप लावलं होतं. सगळं झाल्यावर म्हणाले मी ह्या फोन करुन सांगितले इकडे जा, त्याला सांगितले मंत्रीपद देतो हे सर्व बोलता बोलता सांगून टाकलं. पण तुमच्या इमेजला ही गोष्ट शोभली […]
नागपूर : सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकार आक्रमकपणे पावले टाकत आहे पण याउलट महाराष्ट्र सरकार आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर सीमाभागातला मराठी ठसा पुसला जाईल, अशी भीती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. ते आज नागपुरात विधीमंडळ अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठराव संमत केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव […]
२०२३ मधील सरकारी सुट्ट्यांचं पत्रक जाहीर मुंबई : येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे. २०२३ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. जानेवारी २०२३ २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) फेब्रुवारी […]
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून […]
मेलबर्न : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबत बरेच विक्रम त्याने नावावर केले आहेत. 200 धावा केल्यानंतर त्याला हाताच्या दुखण्यामुळे मैदान सोडावे लागले होते, त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. […]
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला संपूर्ण ठराव “नोव्हेंबर १९५६ […]
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. सीमा भागातील ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्ट काढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअॅप अॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद […]