नवी दिल्ली : गेल्या दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेत कोरोना परिस्ठितीचा आढावा घेतला. आजच्या बैठकीत देशातील कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची तयारी काय आहे याचा आढावा घेतला. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी […]
नागपूर : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते. त्यामुळं नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात […]
ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारत आता दुसरा सामना खेळत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच खेळ संपला आहे. ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु सामन्यात भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर […]
कोची : आयपीएल 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावाची सुरुवात खूपच रंजक झाली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान सॅम करन यानं पटकावला असून तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने त्याला विकत घेतलं आहे. तर कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन […]
काठमांडू : 70 आणि 80 च्या दशकातील सीरिअल किलर चार्ल्स शोभराज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 19 वर्षांपासून तो नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. चार्ल्स शोभराजची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथील एका हिंदू महिलेचे बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने उघडकीस आणला होता. या धर्मांतरण प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार राम सातपुते यांनी ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप केला. यासंदर्भात नगर धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप […]
दोन वर्ष कोरोना संकटाने त्रस्त झालेल्या जगावर पुन्हा एकदा कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. चीन, अमेरिका, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जग कोरोनाच्या विळख्यात अडकणार असा अंदाज बांधला जातोय. चीनमध्ये 7 दिवसांतच कोरोनाचे 35 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 9928 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनच्या आरोग्य यंत्रणेवर […]
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, […]
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आपल्या कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या कर्णधाराने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध द्विशतक झळकावले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर मुंबईने तीन शतके झळकावली. अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. रहाणेने हैदराबादविरुद्ध चांगली फलंदाजी करताना 261 चेंडूत 204 धावा केल्या. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि […]