मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर असल्याची बोचरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. राणेंच्या या टीकेनंतर राणे आणि राऊतांमधील वाद अधिक शिगेला जाण्याची शक्यता आहे. राणेंच्या या टीकेला आता राऊत काय उत्तर देणारे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणेंनी यावेळी सामनामध्ये प्रकाशित लेखावर […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता काकडे यांनी फडणवीसांचे मुंबई येथील शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पांचे दर्शन घेत साकडे घातले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध […]
Nepal Kushal Malla Fastest Century In Asian Games : आशियाई गेम्समध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले. नेपाळ संघाने अवघ्या 120 चेंडूत 314 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने टी-20 सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 2017 मध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 […]
मुंबई : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असून, आता बावनकुळेंनी दिलेले ढाब्यावरचे निमंत्रण सामाजिक कार्यकर्ते हेरंब […]
Unknow Facts About Waheeda Rehman : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. वहिदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहिदा रहमान त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहत असे मात्र, वहिदा यांच्याशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत ज्या चाहत्यांना माहिती नाही. […]
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी (Gautam Adanai) यांनी नुकताच अहमदाबाद येथे गौतम अदानींच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर अदानी आणि पवारांचा एकत्र फोटो समोर आला होता. दोघांच्या एकत्रित फोटोची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली होती. मात्र, आता अदानी आणि पवारांच्या या भेटीमागे बारामतीचं कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. स्वतः […]
नवी दिल्ली : आगामी काळात दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असून, हीच नफा कमावण्याची नामी संधी आहे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने वरील सल्ला दिला आहे. तसेच येत्या दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने […]
कोलंबो : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeepsingh Nijjar) हत्येनंतर भारत आणि कॅनडा देशातील संबंध बिघडले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकीकडे जगभरातील काही देशांनी कॅनडाची बाजू घेत असताना आता भारताचा शेजारी श्रीलंका भारतासाठी दंड थोपटून कॅनडाविरोधात मैदानात उतरला आहे. कॅनडा-भारत वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी जस्टिन ट्रुडो यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले […]
नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी वायनाड सोडावे आणि शेरवानी-काळ्या टोपीच्या माणसाशी लढावे असे चॅलेंज ओवैसी यांनी दिले आहे. ओवैसी यांच्या या आव्हानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राहुल गांधींसाठी […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांची तुलना सापाशी करण्यात आली होती, असा खुलासा माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग (Subhash Garg) यांनी केला आहे. गर्ग यांच्या ‘वी अल्सो मेक पॉलिसी’ या पुस्तकात गर्ग यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. […]