- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Cricket News : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वीच ‘हे’ दोन खेळाडू झाले बाहेर
मुंबई : भारताविरुद्धच्या (India) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) 9 फेब्रुवारीपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो नागपुरात खेळणार नाही. एवढेच नाही तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत हेजलवूडची खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. […]
-
Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप
नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे (Turkey Earthquake) जोरदार धक्के जाणवले. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 7.8 इतकी मोजली गेली. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. हा आकडा अजून वाढू शकतो. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली […]
-
Kasba आणि Chinchwad पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आज अर्ज भरणार
पुणे : पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक व चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून इतर पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र निवडणुका होणारच अशी […]
-
Jitendra Awhad यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षिस; BJP नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात आक्रोश वाढला आहे. यातच जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा भाजपा (BJP) ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये हिंदू जनआक्रोश […]
-
पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी बनला शाहिद आफ्रिदीचा जावई
नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) दुसरी मोठी मुलगी अंशासोबत (Ansha Afridi) कराचीमध्ये विवाह केला. या दोघांच्या लग्नाला अनेकांनी हजेरी लावली होती. शाहीनच्या लग्नात पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडूही तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. याआधी, शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षाचेही गेल्या वर्षाच्या अखेरीस 30 […]
-
Ajit Pawar : महाविकास आघाडी अडचणीत येईल असं वक्तव्य मी करणार नाही
अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे चांगलेच गाजले. यातच पक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसने तांबे यांना पक्षातून निलंबित केले. मात्र सत्यजित तांबे यांच्या घरातील वाद अजित पवारांनी (Ajit Pawar) लावला, यावर पवार म्हणाले, माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये अडचणी निर्माण होतील असं मी कोणतही वक्तव्य करणार नाही, असे वक्तव्य विरोधी पक्ष […]
-
Ajit Pawar : कसबा, चिंचवडची निवडणूक होणारच; जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं
अहमदनगर : कसबा – चिंचवड निवडणुकीवरून सध्या राज्यात वातावरण पेटलेले आहे. यातच निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. मात्र आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टच बोलले आहे. निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंधच येत नाही, अशा शब्दात एकप्रकारे कसबा व चिंचवड निवडणुका या होणारच असे पवार यांनी […]
-
Amravati Election : आमदार लिंगाडे यांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लिगांडे यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती, असं […]
-
माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती […]
-
Sujay Vikhe : खासदार विखेंसमोरच राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी खासदार विखे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. […]









