पुणे : महाविकास आघाडीने ही जागा जिंकून राज्याला एक वेगळा मेसेज दिला आहे. असंच चिंचवडलाही घडली असती पण तिथे राहुल लकाटे यांच्यामुळे तेथे मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला. त्यांना भाजप शिंदेंनीही सहकार्य केलं. पण त्यामुळे आमचा पराभव झाला असं नाही दोन्ही जागा भाजपच्या आणि सहानुभूती होती. पण या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि […]
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1024.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. पाचव्या बुधवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
मुंबई : बाजार नियामक सेबी (SEBI)ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या पत्नी आणि मेहुण्यावर कारवाई केली आहे. यूट्युबवर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. सेबीने अर्शद सह 45 यूट्युबर्संना शेअर पंप अॅंड डंप योजनेमध्ये (Share Pump & Dump scheme) दोषी घोषित केले. या लोकांवर गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणे आणि शेअर बाजाराला नुकसान […]
पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे साधारण निकाल समोर येईपर्यंत त्यावर बोलणे उचित नव्हते म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खूशी थोडा गम अशा झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. 1995 पासून भाजपच्या आधी गिरीष बापट आणि मुक्ता टिळकांनी जिंकल्या. मात्र यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या […]
शिलॉंग : त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून 3 तासांची मोजणी पूर्ण झाली आहे. या तिन्ही राज्यांत सर्व जागांवरील कल पुढे आले आहेत. नागालॅंड आणि त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मेघालयमधेये एनपीपी मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. नागालॅंडमध्ये भाजपा युतीला 41 जागांवर आणि त्रिपुरामध्ये 31 जागांवर पुढे आहे. मेघालयमध्ये एनपीपी […]
अगरताळा : त्रिपुरामध्ये विधानसभा 2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60 जागांवर, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) जागांवर निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. कारण त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही पक्ष आता 23-23 जागांवर आघाडीवर आहेत. यापूर्वी भाजप आघाडीला बहुमत […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले होते. संजय राऊतांच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब झाले होते. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर व्हरांडा, कॅंटिन किंवा पॅसेजमध्ये आमदारांचा गप्पांचा […]
मुंबई : ‘संजय राऊत जे बोलले ते सभागृहाच्या बाहेर बोलले त्यामुळे त्यांच्यावर कायद्याने हक्कभंगाची कारवाई करण्यात येऊ शकत नाही. पण या देशात लोकशाही राहिलीय कुठे ? त्यामुळे कोणावरही कोणतीही कारवाई होऊ शकते. संजय राऊतांविरोधात आणलेला हक्कभंगाचा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर संजय […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.’घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या मनात […]
मुंबई : आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार राम शिंदे हे राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करताना ते बोलत असताना विधिमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP)केली. यावेळी राम शिंदे यांनी […]