चेन्नई : मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने गुरुवारी सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. सामंथाने आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ साठी डबिंग सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियन लेखिका निक्की […]
पुणे : भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यातील मान- खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून प्रकृती चांगली झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यामुळे त्यांना 24 डिसेंबरला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते 5 जानेवारी येथेच उपचार घेत होते. दरम्यान, […]
मुंबई : ‘उरल्या सुरल्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी? आता यांना काय समजणार रोड शो? जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाही. यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर.’ अशी टीका भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी खासदार […]
नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खानचा आगामी पठाण हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये […]
पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नाराज नाहीत ते सतत आमच्याशी चर्चा करत असतात संपर्क साधत असतात. तसेच शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का नाही. हे मी सांगू शकत नाही तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो अधिकार मला नाही. शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का? असा […]
मुंबई : महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहुन त्यांनी मराठी संस्कृती फुलवण्यात मोठं योगदान दिलं. सत्तरच्या दशकात अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात. सांगलीतून मुंबईत आणि नंतर ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी झालेली हानी आहे. 1970 च्या दरम्यान जे […]
पाथर्डी : ‘आम्ही लोकांच्या हिताच्या भूमिकेतून उपोषण केले. आंदोलनकर्ते उपोषणस्थळी जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. ते काय खिशात ठेवायला आहेत का? तुमच्याकडे असतील तर ते लाईव्ह करा. आम्ही खऱ्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातानाचे कुठे फोटो आला, तर हा निलेश लंके आत्ता या क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल. असे आव्हान आमदार निलेश लंके […]
मुंबई :’संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.’ असं स्पष्टीकरण ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी दिलं. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हे स्पष्टीकरण दिलं. नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर […]
वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’ मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित […]
मुंबई : ‘हे सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता. तो कोणाचाही ऐकत नव्हता. तसे हे व्हाईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील, नशीब पोलीस मतदान करत नाहीत, एवढेच राहिलाय आता. नाही तर सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू. असं ही व्हयचं, असं कधी होतं का ? इतके वर्ष स्थानिक स्वराज्य […]