शिलॉंग : त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून 3 तासांची मोजणी पूर्ण झाली आहे. या तिन्ही राज्यांत सर्व जागांवरील कल पुढे आले आहेत. नागालॅंड आणि त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मेघालयमधेये एनपीपी मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. नागालॅंडमध्ये भाजपा युतीला 41 जागांवर आणि त्रिपुरामध्ये 31 जागांवर पुढे आहे. मेघालयमध्ये एनपीपी […]
अगरताळा : त्रिपुरामध्ये विधानसभा 2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60 जागांवर, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) जागांवर निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. कारण त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही पक्ष आता 23-23 जागांवर आघाडीवर आहेत. यापूर्वी भाजप आघाडीला बहुमत […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले होते. संजय राऊतांच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब झाले होते. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर व्हरांडा, कॅंटिन किंवा पॅसेजमध्ये आमदारांचा गप्पांचा […]
मुंबई : ‘संजय राऊत जे बोलले ते सभागृहाच्या बाहेर बोलले त्यामुळे त्यांच्यावर कायद्याने हक्कभंगाची कारवाई करण्यात येऊ शकत नाही. पण या देशात लोकशाही राहिलीय कुठे ? त्यामुळे कोणावरही कोणतीही कारवाई होऊ शकते. संजय राऊतांविरोधात आणलेला हक्कभंगाचा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर संजय […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत.’घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या मनात […]
मुंबई : आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार राम शिंदे हे राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करताना ते बोलत असताना विधिमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP)केली. यावेळी राम शिंदे यांनी […]
मुंबई : जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore), त्यांचं सौंदर्य, अदा, अभिनय आणि गालावर पडणारी खळी अशी त्यांची ओळख सांगता येते. गेली अनेक वर्ष त्या चित्रपटसृष्टीवर राज्या करत आहेत. ब्लॅक अॅन्ड व्हाईटच्या काळापासून ते आजच्या ओटीटीपर्यंत त्यांची जादू कायम आहे. आता त्यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर आता त्या पुन्हा […]
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सरकारने काय कराव ? याची दिशा ठरत असते. तसेच सरकारचा कारभार कसा सुरू आहे ? याचं प्रतिबिंब यामध्ये असतं. राज्यापालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या सर्वांगीन विकासाचा विचार झाल्याचं दिसतं. पण जेव्हा पुर्वी महाविकास आघाडीचं सरकार होत. तेव्हा केंद्र आणि राज्यात कोणताही समन्वय नव्हता. महाविकास आघाडीचं सरकार अहंकारात बुडलेलं सरकार होतं. विविध योजना त्यावेळी […]
मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे या आपल्या बाळाची […]