Ravindra Mahajani Death: ‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘मुंबईचा फौजदार’! कसा होता रवींद्र महाजनींचा प्रवास

Ravindra Mahajani Death: ‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘मुंबईचा फौजदार’! कसा होता रवींद्र महाजनींचा प्रवास

Ravindra Mahajani Passed Away: मराठी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड झाले आहेत. रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) मराठी मनोरंजन क्षेत्रातील देखणे आणि दमदार असे अभिनेते आणि दिग्दर्शक होते. (Ravindra Mahajani Passed Away) ७०च्या दशकाच्या उत्तरार्ध ते ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत महाजनी यांनी मराठी सिनेमामध्ये अभिनय सर्वांचं चांगलीच भुरळ पडली होती. १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये पहिल्यांदा त्यांनी टॅक्सी चालवली आणि सिनेमाचे ऑडिशन दिले होते. त्यांनी १९८७- १९८८ पर्यंत मराठी सिनेमा बनवले. असं सांगितले जातं की, दिग्दर्शक एन. चंद्रा यांची इच्छा होती की, रवींद्र महाजनी यांनी १९८६ अंकुश या सिनेमामध्ये अभिनय करावा. परंतु, महाजनी यांनी त्यावेळेस नकार दिला होता.

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह

महाजनी यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांमध्ये हा सागरी किनारा, खेळ कुणाला दैवाचा कळला, सुंबरान, फिटे अंधाराचे जाळे अशा सुपरहिट गाण्यांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली होती. त्यांनी देवता, सर्जा, दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत, हळदी कुंकू अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्याचे दिसून आले आहे. लक्ष्मीची पावले हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. २०१५ मध्ये काय राव तुम्ही या सिनेमातून त्यांनी वापसी केली होती.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

महाजनी यांच्या प्रसिद्ध सिनेमा पाहा देवता, मुंबईचा फौजदार, देवघर, गोंधळातला गोंधळ, आराम हराम आहे, थोरली जाऊ, हळदी कुंकू, देऊळबंद, काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, गूंज या सिनेमात त्यांची रंजक भूमिका दिसून आली आहे. आणि हे सिनेमे त्यांचे सुपरहिट ठरले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube