KBC Marathi : कोण होणार करोडपती? मध्ये दिसणार ‘बांबू लेडी’ मीनाक्षी वाळके…

KBC Marathi : कोण होणार करोडपती? मध्ये दिसणार ‘बांबू लेडी’ मीनाक्षी वाळके…

KBC Marathi : ‘कोण होणार ‘करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रम अल्पावधीत काळात लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये आज शनिवारी बांबू लेडी मीनाक्षी वाळके आणि अभिनेत्री शुभांगी गोखले, विभावरी देशपांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याचा एक प्रोमो कार्यक्रमाच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (Bamboo lady Minakshai Valake in Kon Honar Crorepati with Shubhangi Gokhale and Aasavari Deshpande )

इंग्रजांना टक्कर देणारी ‘गरिबांची औषध कंपनी’ विकली जाणार; नेमकं प्रकरण काय?

कोण आहेत मीनाक्षी वाळके?

मीनाक्षी वाळके यांचा संघर्षमय प्रवास यांनी या कार्यक्रमात सांगितला. त्यांचा प्रवास सुरू झाला तो त्यांनी बांबू प्रशिक्षण केंद्रात बांबू हस्तकला प्रशिक्षण घेतल्या पासून. यातून त्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळाली. बांबू हस्तकलेमुळे त्यांनी विविध संधी मिळाल्या. यातून त्यांनी आर्थिक संकटांना तोंड देत इतर महिलांना देखील सक्षम केले.

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कधी चढणार बोहल्यावर? कोण आहे त्याची होणारी बायको…

त्यांच्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. यावर्षी त्यांना ‘इन्स्पायरिंग इंडियन वुमेन’ लंडन तर्फे ‘आयआयडब्ल्यू शी इन्स्पायर्स अॅवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार उपेक्षित महिलांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्यांना दिला जातो. तर बांबू लेडी ऑफ महाराष्ट्रा हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.

तर कॅनडाचा इंडे-कॅनेडियन आर्टनस अॅंड कल्चरल इनिशिएव्हने त्यांना प्रतिष्ठीत चुमन हिरो ही पदवी दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणारा त्यांच्या संघर्षावर आधारित चित्रपट 16 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती मीनाक्षी वाळके यांनी दिली. तर त्यांच्या कार्याची दखल ‘कोण होणार करोडपती’ ने घेत त्यांना आमंत्रित केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube