केबीसीमध्ये उद्धटपणे बोलणारा मुलगा ट्रोल; अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, मी स्तब्ध, बोलायला काहीही…

Boy trolled for in KBC बच्चन यांच्या केबीसीतील मुलगा प्रचंड ट्रोल होत आहे. त्यानंतर आता बच्चन यांनी पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Amitabh Bachchan

Boy trolled for speaking rudely in KBC; Amitabh Bachchan said, I stunned, nothing to say : अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित केबीसी या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला एक पाचव्या इयत्तेतील मुलगा सध्या सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल होत आहे. त्यानंतर आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी देखील पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कबुतरांना दाणे देणं थांबवा! हर्षा भोगलेंची पोस्ट, पुण्याच्या माजी नगरसेवकाने कबुतरांमुळे गमावली मुलगी

केबीसीच्या 17 व्या सीझनमध्ये गुजरातच्या गांधीनगरमधील इशित भट्ट या पाचव्या इयत्तेतील मुलाने सहभाग घेतला होता. मात्र यावेळी त्याने अमिताभ यांना प्रश्नांची उत्तर देताना संवाद साधताना उद्धटपणे बोलला आहे. त्याच्या या ओव्हर कॉन्फिडन्स आणि वागणूक ही प्रेक्षकांना आवडलेली नाही. तसेच अमिताभ यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्याशी हा मुलगा उद्धटपणे बोलला आहे. हे देखील रूचलेले नाही.

https://x.com/SrBachchan/status/1977445374567612538

Video : आजींनी केली गंमतीशीर मागणी; खासदार सुप्रिया सुळेंना हसू आवरेना

दरम्यान सोशल मिडीयावर यावर या मुलाचं प्रचंड ट्रोलिंग होत आहे. त्याच्यावर पालकांनी हे संस्कार केले आहेत का? असा सवाल केला जात आहे. तर एका युजरने म्हटलं आहे की, काही नाही दोन झापडा लगावल्या पाहिजेत. तुम्हीच त्याला कानशि‍लात लगावल्या पाहिजे असंही एकजण अमिताभ यांना म्हटलं.

ठरलंय फॉरेवर! ऋता दुर्गुळे अन् टीम घेऊन येतेय मराठी थिएटरचं नवं रूप…

तर यावर बोलताना अमिकताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, बोलायला काहीच नाही. मी फक्त स्तब्ध आहे.

follow us