श्री शंकर महाराज यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर! महसुल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च

Chandrashekhar Bawankule Launches Avaliya Shri Shankar Maharaj Movie Poster : श्री शंकर महाराज (Avaliya Shri Shankar Maharaj) हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी कधीच उपाधी लावल्या नाहीत.
‘अवलिया’ श्री शंकर महाराज या आगामी चित्रपटातून (Upcoming Movie) त्यांचा जीवनपट आपल्या भेटीस येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. शंकर महाराज समाधी सोहळ्याच्या दिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले.
Mock Drill In India : देशात उद्या युद्धसराव; पुण्यासह 16 शहरांत सायरन वाजून काळोख होणार!
जयशंकर प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. भाजपाचे मा.राजेंद्र (आबा) शिळीमकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शशी चंद्रकांत खंदारे यांचे असून याआधी त्यांनी अनेक महोत्सवात गौरवलेल्या ‘जिप्सी’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.
‘अवलिया’ हा चित्रपट श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्यावर असणार आहे. 1800 च्या सुमारास श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकट झाले. 1947 मध्ये त्यांनी समाधी घेतली. या 150 वर्षाच्या कालखंडात त्यांनी असंख्य लीला केल्या, अगणित भक्तांना सन्मार्ग दाखवले, त्यांचा उद्धार केला. अशा आधुनिक काळातील सत्पुरुषावर सदर चित्रपट असणार आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान; वादळी वाऱ्यासह गारांच्या धारा, पिकांचं अतोनात नुकसान
श्री सद्गुरू शंकर महाराजांवर आधारित असलेल्या बहुतांश कलाकृती मध्ये केवळ चमत्कारांवर भर देण्यात आला आहे. महाराज हे चमत्काराच्या ही खूप पुढे आहेत. त्यांनी चमत्कार हे केवळ भक्तांचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी केले आहेत. शंकर महाराजांनी असंख्य लीला केल्या. त्याचबरोबर त्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक ही होता, हे विसरून चालणार नाही. महाराजांनी केलेल्या अगाध लीलांबरोबरच महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. चित्रपटातील कलाकरांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे लेखक दिग्दर्शक शशी चंद्रकांत खंदारे यांनी सांगितले.