अभिनेता Aditya Singh Rajput मृत्यू प्रकणात ‘ड्रग्ज’ची एन्ट्री; शेवटच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय होते?
Enter Drugs in Aditya Singh Rajput Death Case, what’s in Last Instagram story : ‘स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. 32 वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. तर हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला असं देखील बोलंल जात आहे. यादरम्यान अनेक चर्चांना उधान आले आहे. आता यावर आदित्यसिंह राजपूत याची मैत्रीण सुबुही जोशी हिने ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा फोटाळून लावला आहे. त्याचबरोबर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील ही माहीती दिली आहे.
Aditya Singh Rajput : 17 व्या वर्षी करिअरची सुरुवात ते यशस्वी अभिनेता : कोण होता आदित्य सिंग राजपूत?
सुबुही म्हणाली मला समजत नाही लोक एवढे असंवेदनशील कसे असू शकतात. मला ह्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांचा राग आला आहे. माझ्या मित्राच्या मृत्यूचा तमाशा बनवला आहे. त्यानंतर तिने आदित्याचा त्या दिवशीचा सर्व दिनक्रम सांगितला. आदित्य हा मुंबईतील अंधेरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.
The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास
आदित्यचा मृत्यू झाला त्या दिवशी साकाळी 11 वाजता माझं त्याच्याशी बोलण झालं. आम्ही रोज फोनवर बोलत होतो. त्यावरून त्याला काही समस्या किंवा दुःख आहे असं वाटत नव्हत. त्याला अॅसिडिटीचा त्रास होत असल्याचं त्याच्या घरातील कामगाराने सांगितलं. त्यावर त्याने औषध घेतलं. मात्र दुपारी अचानक तो बाथरूममध्ये पडल्याचं कळालं. त्याला त्याच्या कामगाराने गार्ड्सच्या मदतीने त्याला बाहेर काढले बेडवर झोपवले.
Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी
यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले नव्हते. बिल्डिंगच्या खालील डॉक्टरांनीच त्याचा मृत्यू बाथरूममध्ये पडल्याने झाल्याचं सांगितलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी आदित्यचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. त्यामुळे ते रिपोर्ट येईपर्यंत कोणत्याही अफवा निर्माण करू नये असे सुबुहीने सांगितले.
सुबुही सांगते, मी सहसा आदित्यच्या सर्व पार्ट्यांमध्ये उपस्थित असते, पण काल रात्री तो त्याच्या तीन मित्रांसोबत बॉईज पार्टी करत होता. पार्टीदरम्यान मी आदित्यशी व्हिडिओ कॉलवर बोललो. ते लोक मजा करत होते. रात्री उशिरा पार्टी करून सर्व मित्र घरी परतले आणि आदित्य झोपला होता. सकाळी उठल्यावर त्याला एसीडीटीचा त्रास झाला. ही काही पहिलीच वेळ नव्हती, त्याची नेहमीच तक्रार असायची. पोलिसांनी पार्टीत उपस्थित असलेल्या या मित्रांचीही चौकशी केली आहे. दरम्यान आदित्यने काल रात्रीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. यावरून असे दिसून येते की, तो मृत्यूच्या काही तास आधी पार्टी करत होता. आदित्यची 17 तासांपूर्वीची ही इंस्टाग्राम स्टोरी आहे.
Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्रोने रचला इतिहास, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
आदित्य राजपूतला याला टीव्ही रियॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला’ प्रसिध्द मिळाली होती. कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्याने नाव कमविले होते. त्याने तीनशेहून अधिक टीव्ही जाहिरातीत काम केले आहे. आदित्य सिंग राजपूत याचा जन्म दिल्लीत झालेला असून, त्याचे कुटुंब मुळचे उत्तराखंड येथील आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा कुटुंबात आई-वडिल आणि मोठी बहिण असा परिवार आहे.